
गुटखा तस्करावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही…
स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा तस्करीवर मोठी कार्यवाही,कंटेनरसह ७१ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…..
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात गुटखा तस्करी करणा-या इसमांवर बारकाईने लक्ष देवुन जास्तीत जास्त केसेस करुन गुटखा विक्रीवर आळा घालणे संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलिस स्टेशन यांना आदेशित केले होते


त्या अनुषगांने दि १५/०४/२०२५ रोजी स्थागुशा, अमरावती चे पथक पो. स्टे. तिवसा हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली कि, नागपुर कडुन अमरावती अकोला कडे एक कंटेनर मध्ये महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा अवैधरित्या वाहतुक करुन येणार आहे.अशा गोपनिय खबरेवरुन स्थागुशा पथक तळेगाव ते तिवसा हायवेवर ग्राम वरखेड जवळ सापळा लावुन बसले असता तळेगाव कडुन तिवसा कडे एक कंटेनर संशयितरित्या येत असतांना दिसला.

त्या कंटेनर ला थांबुन पाहणी केली असता कंटेनर मध्ये एक इसम बसुन दिसला त्यांला त्यांचे नाव गाव विचारले असता वाहन चालक याने त्याचे नाव गुलाब सरमन अहेरवार वय ४४ वर्ष, रा.गोना, तहसिल पाली, जिल्हा ललीतपुर, राज्य उत्तरप्रदेश असे सांगितले. त्यांचे कंटेनर ची पंचासमक्ष झडती केली असता कंटेनर मध्ये १०० पोते बहार सुगंधीत पान मसाला व बिएचआर सुगंधीत तंबाखु कि.अं. ३६,६०,०००/- रु माल मिळुन आला. सदर माल हा दिल्ली येथुन आणुन अकोला येथे घेवुन जात असल्याचे गुलाब सरमन अहेरवार याने सांगितले. वरुन त्याचे ताब्यातुन ३६,६०,०००/-रु मानवी आरोग्यास व जिवीतास धोका करणारा तबांखुजन्य सुगंधीत पानमसाला व सदर गुटखा वाहतुक करण्याकरीता वापरलेले कंटेनर क. RJ 11 GC 0352 कि.अं. ३५,००,००० रु आणि सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन कि.अं.१०,०००/- रू असा एकुण ७१,७०,००० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पो स्टे तिवसा यांचे ताब्यात देवुन त्याचेवर कलम १२३,२२३,२७४,२७५,३(५) भा. न्या.सं. सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानके अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात पो.उप.नि. सागर हटवार, मुलचंद भांबुरकर, पोलिस अंमलदार वळवंत दाभणे, रविंन्द्र बावणे, भुषण पेठे, मंगेश लकडे, सचीन मसांगे, चालक संजय प्रधान यांनी केली.


