
रेकॅार्डवरील गुन्हेगारास LCB ने ताब्यात घेऊन, ९ मोटारसायकल जप्त करुन दुचाकी चोरीचे गुन्हे केले उघड….
स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्ड वरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याचेकडुन ०९ मोटार सायकल जप्त करुन,दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे केले उघड….
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ३० एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अधिनस्त असलेले उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी असे पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचे मार्गदर्शनात तसेच पोलिस निरीक्षक, स्यागुशा यांचे नेतृत्वात चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरी होत असल्याने मोटार सायकल चोरांचा शोध घेणे हे चंद्रपुर पोलिसांसमोर आव्हान होते त्याअनुषंगाने तसेच अज्ञात आरोपींचा शोध घेणेकरीता रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन गोपनीय माहिती प्राप्त झाली की, एक इसम त्याचे ताब्यातील विना कागदपत्राची तसेच विना नंबरची मोटार सायकल विक्री करीता बंगाली कॅम्प चौक, चंदपुर येथे ग्राहकाचे शोधात फिरत आहे.


सदर गोपनीय माहीतीवरुन वरून सापळा रचुन आरोपी मिलींद जयभारत इंभारे, वय-३२ वर्ष, रा. लोणी, ता. कोरपणा, जि. चंद्रपुर यास बंगाली कॅम्प चौक, चंद्रपुर यांस ताब्यात घेवुन कौशल्यपुर्ण तपास करून त्याचे कडुन वेगवेगळया ठिकाणाहुन सदर आरोपीचे ताब्यातुन वेग-वेगळया कंपनीच्या मोटार सायकल तसेच मोपेड गाडी असा एकुण ४,९०,०००/- रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यात पोलिस स्टेशन रामनगर, चंद्रपुर शहर, राजुरा तसेच हिगनघाट जि. वर्धा येथील असे एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. नमुद आरोपीवर चंद्रपुर जिल्हयात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, मधुकर सामलवार,सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे,रजनिकांत पुठ्ठवार,दिपक डोंगरे,पोशि प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे,शशांक बदामवार,अमोल सावे, प्रमोद कोटनाके सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.



