
बॅंक वसुली अधिकारी असल्याचे सांगुन केली फसवणुक स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा केला उघड…
चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०९/१०/२०२३ रोजी फिर्यादी मंजुळाबाई नथ्थुजी झाडे वय ६५ वर्ष रा येन्सा, ता.
वरोरा, जिल्हा चंद्रपुर या आपल्या घरी असतांना दोन अनोळखी इसम घरी आले व आम्ही बँकेचे अधिकारी आहोत असे सांगुन तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेमार्फत १,४०,०००/- रू. व बैलगाडीसाठी ३,००,०००/- रू. मंजुर झाले आहेत अशी बतावणी करून त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर २२०००/- रू नगदी
भरावे लागतील म्हणून फिर्यादीकडील सोन्याची पोत व कानातील बिया असा एकुण ३८०००/- रू.चे सोन्याचे दागिने आरोपीतांनी फिर्यादीची फसवणुक करून सोबत घेवून पळून गेले वरून पोलिस स्टेशन वरोरा येथे नोंद करण्यात आला.
त्याच दिवशी दुपारच्या दरम्यान त्याच आरोपीतांनी मौजा भटाळी, पोलिस स्टेशन शेगांव, ता. वरोरा हद्दीत त्याचप्रकारचा आणखी दुसरा गुन्हा पोलिस स्टेशन शेगांव येथे दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक, चंद्रपूर, अपर पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. विनोद भुरले व पोस्टॉप यांना सदर आरोपींचा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले. सदर अधिकारी व कर्मचारी यांनी कौशल्यपुर्ण तपास करून गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता


रामराव भिमराव ढोबळे, वय ५१ वर्ष रा. तीवसा, ता. तीवसा, जिल्हा अमरावती या आरोपीने आपल्या साथीदाराच्या सहकार्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. गोपनिय बातमीदाराकडून तसेच गुणवत्तापुर्वक तपास करून आरोपी रामराव भिमराव ढोबळे यास मौजा केळवड, ता. सावनेर, जिल्हा चंद्रपुर येथून ताब्यात घेवून
विचारपुस केली असता वरील दोन्ही गुन्हे सदर आरोपीने आपल्या सहकार्याच्या मदतीने केल्याचे कबुल केले.
सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली होन्डा शाईन गाडी जप्त करण्यात आली असुन सदर आरोपीचे क्राईम रेकॉर्ड चेक केले असता, आरोपीवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजले. अशा प्रकारे

सदर गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याची कार्यवाही पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक रीना जनबंधु, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि. विनोद भुरले, पोहवा. धनराज करकाडे, नापोशि. चंदु नागरे,प्रशांत नागोसे, दिनेश आराळे तसेच पोस्टे सायबर, चंद्रपुर यांचे सहकार्याने केली असून आरोपींना पुढिल तपासकामी पोलिस स्टेशन, वरोरा येथे ताब्यात देण्यात आले.



