
सोलर प्लॅंटमधील कॅापर वायर चोरनार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन कॅापर वायर चोरीचे २ गुन्हे केले उघड….
निजामपूर हद्दीतील सोलर प्लान्ट मधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या 06 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,त्यापैकी 02 आरोपींकडुन एकुण 1,52,300/- रु.किं.ची कॉपर केबल जप्त करुन, कॉपर केबल चोरीचे 02 गुन्हे केले उघड….
धुळे(ॲड प्रेम सोनार) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(15) एप्रिल 2024 रोजी तक्रारदार श्री. रामदास मांगु ठाकरे, सिक्युरिटी सुपरवायझर, लॅन्को सोलर कंपनी रा.निजामपुर ता. साक्री जि. धुळे यांनी तक्रार दिली की, दि.06/03/2024 रोजीचे रात्री 11.00 वाजेपासुन ते दि. 12/04/2024 रोजीचे सकाळी 08.00 वाजेच्या दरम्यान साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथील लॅन्को सोलर कंपनीच्या कंम्पाऊन्ड मधील विविध ब्लॉक मधुन एकुण 74,700/- रु. किंमतीच्या कॉपर केबल वायर कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचे व कंपनीच्या संमतीशिवाय चोरुन नेल्या म्हणुन निजामपुर पोलिस ठाणे येथे गु.र.नं.0113/2024 भादंवि कलम 379 प्रमाणे कॉपर केबल वायर चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखे मार्फत सुरु असतांना, दि.23/09/2024 रोजी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा वाघापुर गावात राहणारा (1) भिमा नारायण बोरकर याने त्याचा साथीदार 2) कृष्णा संतोष गोयकर 3) आण्णा येडु बाचकर 4) रतन हरी बोरकर 5) योगेश गोरख वाघमोडे 6) सागर ताथु बोरकर, सर्व रा. मु.पो.वाघापुर ता. साक्री जि. धुळे यांचे मदतीने केला आहे.

त्यानुसार सदर नमुद आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी (1) भिमा नारायण बोरकर, वय-24 वर्ष, व्यवसाय मेंढपाळ रा. मु.पो.वाघापुर ता. साक्री जि. धुळे व (2) रतन हरी बोरकर, वय-20 वर्ष, व्यवसाय मेंढपाळ रा.मु.पो.वाघापुर ता.साक्री जि. धुळे हे वेहेरगाव फाटा ते रायपूर वारी रस्त्यावर लॅन्को कंपनीजवळ मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन, सखोल विचारपुस केली असता, त्यांनी सदर गुन्हयाची कबुली देवुन, सदरचा गुन्हा त्यांचे गावातील साथीदार (3) कृष्णा संतोष गोयकर (4) आण्णा येडु बाचकर (5) योगेश गोरख वाघमोडे (6) सागर ताथु बोरकर सर्व रा.मु.पो. वाघापुर ता. साक्री जि. धुळे यांचेसह मिळून केला असल्याची कबुली देवुन सदर गुन्हयात चोरी केलेली कॉपर केवल वायर तसेच यापुर्वी त्यांनी सर्वांनी मिळुन शिवाजीनगर शिवारात माहे एप्रिल 2024 मध्ये चोरी केलेल्या एकुन १५२३००/-रु किंमतीच्या कॉपर केवल काढुन दिलेल्या आहेत.

वर नमुद ताब्यातील आरोपी (1) भिमा नारायण बोरकर व (2) रतन हरी बोरकर यांचेकडे अधिकची विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचे फरार साथीदार (3) कृष्णा संतोष गोयकर (4) आण्णा येडु वाचकर (5) योगेश गोरख वाघमोडे (6) सागर ताथु बोरकर सर्व रा.मु.पो.वाघापुर ता. साक्री यांचे मदतीने एकत्रितरित्या माहे एप्रिल-2024 मध्ये लॅन्को सोलर कंपनीच्या कंम्पाऊन्ड मधुन व मागील 10 ते 12 दिवसापुर्वी शिवाजीनगर शिवारातील सोलर उर्जा कंपनीमधुन कॉपर केवल वायर चोरी केलेली असल्याचे सांगितल्याने, एकुण 03 आरोपीतांकडुन एकुण 1,52,300/- रु.किं.च्या कॉपर केबल हस्तगत करुन निजामपूर पोलीस ठाणे येथे दाखल खालील कॉपर केवल चोरीचे 02 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.तसेच वरील नमुद आरोपींचे गुन्हे अभिलेखाची माहिती घेतली असता, त्यांचेवर यापुर्वीही बरेच गुन्हे नोंद आहेत
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे व उपविभागिय पोलिस अधिकारी.धुळे ग्रामीण संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि. प्रकाश पाटील,सफौ. संजय पाटील, पोहवा. सदेसिंग चव्हाण, संदीप सरग, चेतन बोरसे, संतोष हिरे, पोशि. गुणवंत पाटील, अतुल निकम व योगेश जगताप अशांनी केलेली आहे.


