
बकरी चोर विधिसंघर्षित बालकास त्यांचे मित्रासह सावंगी मेघे पोलिसांनी घेतले ताब्यात….
ग्रामीण भागातुन बकऱ्या चोरी करुन भितीचे वातावरण तयार करणारे अज्ञात आरोपीचा सांवगी मेघे पोलिसांनी लावला छडा….
सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तक्रारदार विलास नारायण सोयाम रा. रोठा, ता.जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे तक्रार दिली की दि. 06 जुलै 2025 चे रात्री दरम्यान त्यांचे घरासमोरील असलेल्या बकऱ्यांचे गोठ्यामध्ये बांधून असलेल्या त्यांच्य 3 बकऱ्या व 1 बोकुड किं. 12,000/ रू. चा माल कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरून नेला अशा तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरूध्द पो.स्टे.सावंगी मेघे येथे अप.क. 566/25 कलम 303 (2), बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून ठाणेदार पंकज वाघोडे पो. स्टे सावंगी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील डी.बी. पथक हे अज्ञात आरोपींचे व चोरीस गेलेल्या मालाचे शोधात असताना मुखबीरकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका विधिसंघर्षीत बालकास विचारपुस केली असता त्याने त्याचे 3 मित्रांचे मदतीने त्यांचे बर्गमॅन व अॅसेस मोपेड गाडीने रात्रीदरम्यान रोठा गावात जावून तेथून बकऱ्या चोरी करून त्या आंजी येथे राहणाऱ्या एका खाटीकास विकल्याचे सांगीतल्याने सदर गुन्हयात विधी संघर्षीत बालकास त्याचा मित्र 1) अनिल विलास भेंडारे वय 20 वर्ष रा. सिंदी मेघे, वर्धा. 2) प्रथम नरेंद्र बोबडे वय 19 वर्ष रा. प्रतापनगर, वर्धा. 3) प्रतिक सुनिल वालदे वय 20 वर्ष रा. सिंदी मेघे, वर्धा. तसेच बकऱ्या विकत घेणारा खाटीक 4) अमोल अशोकराव दुर्गे वय 33 वर्ष रा. आंजी ता.जि. वर्धा. यांना सदर गुन्हयात अटक करून त्यांनी गुन्हयात वापरलेली 1) एक सुझुकी बर्गमॅन मोपेड गाडी क. एम. एच 32 ए.टि 9827 किं. 1,00,000/रू. 2) एक अॅसेस मोपेड गाडी क. एम.एच 32 ए.व्हि 9143 किं. 80,000/रू. 3) बकरी चोरीच्या पैस्यांपैकी नगदी 9,500/रू. असा एकुण जुकिं. 1,89,500/रू. चा मुद्देमाल आरोपी कडून गुन्हयात जप्त करून गुन्हा उघडकीस आणला

सदरची कार्यवाही ही प्रभारी पोलिस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर , यांचे मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी मेघे व डी.बी. पथकाचे पो.हवा संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास संजय पंचभाई हे करीत आहे.



