जबरी चोरी,घरफोडी करणारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चोरी, घरफोडी रस्त्यावर लोकांना थांबवुन लुटनारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद,जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केले उघड….

सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बलराज शंकरराव गुप्ता रा सालोड यांनी पो.स्टे सावंगी मेघे येथे तक्रार दिली की त्यांचे सालोड रोडवरील एका बंद घराचे लॉक व दरवाजा तोडून घरातील स्टिलची गॅस शेगडी व सिलेंडर तसेच हॉलमध्ये फायबर बॉडीचे दोन कुलर, एक खडर्याच्या बॉक्स मध्ये ठेवून असलेले वॉटर फिल्टर, तिन टेबल फॅन, एक फोमची व एक रूईची गादी, एक स्टिलचा पलंग, ३ प्लास्टीक टेबल, इत्यादी साहित्य रात्रदरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरून नेले आहे अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे. अप.क. 456/25 कलम 305 (अ), 331(3), 331 (4) भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता





तसेच संदेश गौतम वाघमारे रा. झाडगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि. 27.04.25 रोजी रात्री 11:00 वा चे सुमारास नागठाणा रोडवरील लोखंडी रेल्वे पुलाजवळ मोटरसायकलने जात असता दोन अज्ञात ईसमांनी तोंडाला बांधून मोपेड गाडीने येवून त्यांना थांबवून त्यांचे खिश्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व पैसे हिसकावून नेले होते यावरुन पो.स्टे ला अप.क. 455/25 कलम 304(2). 3(5) भादवी प्रमाणे नोंद आहे.



सदर दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वरीष्ठांचे मार्गदर्शनात  पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील डी बी पथकाने पो.स्टे. ला दाखल असलेल्या दोन्ही गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना मुखबीरकडून गुप्त माहिती मिळाली की पालोती रोडवरील एका बंद घरी चोरीचे घरगूती सामान आहे, अशा माहितीवरून डी बी पथकाने सदर ठिकाणी जावून आरोपी प्रज्वल विनोद ठाकरे वय 22 वर्ष रा. वार्ड नं. 04 पोटदुखे ले आउट सावंगी मेघे, वर्धा यास ताब्यात घेवून  घराची पाहणी केली असता घरात सदर गुन्हयातील चोरी गेलेले  साहित्य मिळून आले.तसेच प्रज्वल ठाकरे यास त्या साहित्या बाबत विचारपूस केली असता त्याने सांगीतले की हे साहित्य मी काही दिवसांपुर्वी सावंगी ते सालोड रोडवरील हनुमान मंदीराचे जवळ डाव्या बाजुला असलेल्या चिंतामणी लॉज जवळील एका बंद घराचे व तेथे जुने लॉज असलेले घराचे दार तोडून तेथून मी व माझे 3 मित्र १) तारासिंग जग्गासिंग बावरी रा. सिखबेडा सावंगी मेघे 2) संकल्प प्रेमदास शेंदरे रा. तिगाव आमला 3) आकाश दिलीप ओंकार रा. आमला यांच्या मदतीने सुझुकी बर्गमॅन मोपेड गाडी व शाईन मोटरसायकल वर आळीपाळीने चोरून रूमवर आणून ठेवले होते. सदरचे साहित्य हे पो.स्टे सावंगी अप.क. 0456/2025 कलम 305 (अ), 331(3), 331(4) बी.एन.एस. मधील चोरीस गेलेले साहित्य असल्याचे निष्पन्न झाले.



नमुद गुन्ह्यातील आरोपी प्रज्वल ठाकरे याची अंगडझती घेतली असता त्याचे जवळ एक सॅमसंग कंपनीचा एम 31 एस मोबाईल मिळून आला त्याबाबत आय.एम.ई.आय नंबरची पाहणी केली असता सदर मोबाईल पो.स्टे सावंगी मेघे येथे दाखल अप.क. 455/2025 कलम 304(2), 3 (5) बी.एन.एस मधील असल्याचे निष्पन्न झाले.सदर चारही आरोपींना ताब्यात घेवून मा न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींचा 6 दिवस पि.सी.आर. प्राप्त झाला असुन त्यादरम्यान आरोपींकडे  कसोशीने विचारपुस केली असता नमुद आरोपींनी एम. आय.डी.सी. देवळी येथे काम करणारे कामगार यांना त्यांच्या दुचाकी वाहनावर थांबवून त्यांना  त्यांच्याजवळील काही चांदीचे दागीने, नगदी पैसे व मोबाईल फोन हिसकावून जबरीने चोरून नेण्याचे प्रकार केले असल्याबाबत कबूली दिली. त्यावरून पो.स्टे देवळी जि. वर्धा येथे संपर्क केला असता पो.स्टे देवळी येथे 1) अप.क. 411/25 कलम 304, 3(5) बीएनएस 2) अप क. 444/25 कलम 126(2), 309(4). 3(5) बीएनएस 3) अप.क. 440/25 कलम 126 (2). 309(4), 3(5) बीएनएस असे तिन गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यावरून नमुद आरोपीतांकडून पो. स्टे सावंगी मेघे येथील 1) अप.क. 456/25 कलम 305 (अ), 331(3), 331(4) भादवी मधील एकुण 1,35,000/रू. चा माल. 2) अप.क. 455/25 कलम304(2), 3(5) भादवी मधील सॅमसंग मोबाईल किं. 10,000/रू. चा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच पो.स्टे देवळी येथील 1) अप.क. 411/25 कलम 304, 3(5) बीएनएस मधील एक टेक्नो मोबाईल फोन, किं. 10,000/रू. 2) पो.स्टे देवळी अप क. 444/25 कलम 126 (2), 309 (4), 3(5) बीएनएस मधील एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन किं. 10,000/ रू. व गळयातील चांदीची चैन व अंगठी 1500 रू. 3) पो.स्टे देवळी अप.क. 440/25 कलम 126 (2), 309 (4), 3(5) बीएनएस मधील 2500/रू. नगदी असे एकुण 5 गुन्हे उघडकीस आणून अज्ञात आरोपीतांचा शोध घेवून आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली असून आरोपी पी.सी.आर. मध्ये आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक  संदिप कापडे ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे डी बी पथकातील पोहवा संजय पंचभाई,  अनिल वैद्य, निखील फुटाणे, अमोल जाधव, सायबर सेल वर्धा येथील अक्षय राउत यांनी केली, पुढील तपास पोहवा संजय पंचभाई हे करीत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!