
अवैधरित्या देशी दारुची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कार्यवाही,चारचाकी वाहनासह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत….
वर्धा शहरातील जुनापाणी चौकात नाकेबंदी करून देशी दारू व कारसह 7,00,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई…..
वर्धा(प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या गुन्हे आढावा बैठकित पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी शहरात अवैधरित्या येणारा देशी विदेशी दारुचा पुरवठा व त्याची शहरात अवैधरित्या साठवनुक करुन त्याची चिल्लर व चढ्या भावाने विक्री होते यावर निर्बध लागावे म्हनुन प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते तसेच त्यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास सुचना दिल्या होत्या


त्याअनुषंगाने दि 15 जुन 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त माहिती प्राप्त झाली की, इतवारा बाजार वर्धा येथे राहणारा कमल कंजर हा त्याच्या ताब्यातील एका सिल्वर रंगाच्या मारुती सुझुकी रीट्स कार क्रमांक MH 38 4224 मध्ये अमरावती जिल्हातून आर्वी मार्गे वर्धा येथे देशी दारूचा माल अवैद्यरित्या वाहतूक करून घेऊन येत आहे.

अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुना पाणी चौक, वर्धा येथे नाकेबंदी केली असता. पोलिस दिसताच चालक हा गाडी सोडून पळून गेला. सदर गाडीची पाहणी केली असता गाडीचे डिक्कीत व मागील सीटवर 20 खर्ड्याचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या टॅंगो पंच कंपनीच्या 90 ml च्या 2000 सीलबंद बाटल्या गाडीसह किंमत 7,00,000/- रू चा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपी कमल कंजर विरुद्ध पोलिस स्टेशन रामनगर येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे सुचनेप्रमाणे पोहवा शेखर डोंगरे, पोशि प्रमोद पिसे ,विकास मुंडे, सुगम चौधरी, राहुल अधवाल, प्रफुल पुनवटकर ,राहुल लुटे यांनी केली आहे.


