
ठाणेदाराचा असाही मनाचा मोठेपणा,सेवानिव्रुत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करवले झेंडावंदन…
पोलिस स्टेशन तळेगांव (शा.पं.) येथील ठाणेदार यांनी दिला सेवानिवृत्त पोलिस अंमलदार यांना महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान….
तळेगाव (शा पंत)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,०१ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य स्थापना दिनाचे स्मरण म्हणुन राज्यभर ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकवुन झेंडावंदन कार्यक्रम घेण्यात येतो. त्यानुसार दिनांक ०१/०५/२०२५ रोजी पोलिस स्टेशन तळेगांव (शा.पं.) येथे महाराष्ट्र दिनी झेंडावंदन कार्यक्रमात पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि मंगेश भोयर यांनी राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान दिनांक ३०/०४/२०२५ रोजी पोलिस विभागातुन सेवानिवृत्त झालेले पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी श्री. प्रभाकर दुधाट यांना दिला व त्यांचे हस्ते पोलिस स्टेशन मधील राष्ट्रध्वज फडकावून घेतले.


श्री प्रभाकर दुधाट हे मुळचे आर्वी येथील असुन ते सन १९८६ ते २०१० पावेतो एकुण २४ वर्षे सैन्यदलात कर्तव्य बजावले, त्यानंतर सन २०११ मध्ये वर्धा जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणुन भरती होवुन १४ वर्षे सेवा बजावुन दिनांक ३०/०४/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी सैन्यदलात व पोलीस दलात दिलेल्या सेवेचा सन्मान म्हणुन ठाणेदार यांनी महाराष्ट्र दिनी पोलीस स्टेशन तळेगांव (शा.पं.) येथील राष्ट्रध्वज फडविण्याचा मान देवुन पुढील आयुष्याबाबत शुभेच्छा दिल्या.



