स्थानिक गुन्हे शाखेने २५ किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानीक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील टायरबोर्ड गंगानगर नांदेड भागात 4,92,200/- रु किंमतीचा 24.610 किलो गांजा केला जप्त….

नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करणे करीता पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलिस निरीक्षक यांना आदेशित केले होते त्याअनुषंगाने
स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील सपोनि संतोष शेकडे यांचे पथक तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही
करण्याचे आदेश दिले होते





त्यानुसार सपोनि स्थागुशा संतोष शेकडे  यांचे पथकाने नांदेड शहरात गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन दिनांक 26/07/2024 रोजी नायब तहसिलदार के.बि. डांगे,पोनि स्थागुशा
उदय खंडेराय व  पंचासह व पोलीस अमलदार यांचे सह टायरबोर्ड गंगानगर नांदेड या भागात एका घरात विक्रीसाठी गांजा ठेवल्याची मिळालेल्या माहीती प्रमाणे सदर ठिकाणी छापा मारुन इसम  अहेमदखान पि. अनवरखान वय 28 वर्षे व्यवसाय मिस्त्री काम रा.
गंगानगर टायरबोर्ड नांदेड ता. जि. नांदेड यास पकडुन त्यांचे घरातुन एकुण 24.610 किलो गांजा किमंती 4,92,200/- रु जप्त करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे हजर केले व  ‘सपोनि संतोष शेकडे यांचे फिर्याद वरुन वरील सदर  आरोपी विरुध्द पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधिक्षक नांदेड अबिनाश कुमार,अपर पोलिस अधिक्षक भोकर,डॅा खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा उदय खंडेराय, सहा पोलिस निरीक्षक स्थागुशा,  संतोष शेकडे, पोलिस अमलदार गंगाधर कदम, सखाराम नवघरे, संभाजी मुंडे, किशन मुळे, बंडु कलंदर, तानाजी येळगे, मोतीराम पवार, राजु बोधगीरे, शेख इज्राईल, अनिल बिरादार, अकबर पठाण, शिवाजी बिचकुले, महीला अमलदार किरण बाबर, चालक अमलदार दादाराव श्रीरामे, हानुमानसिंह ठाकुर यांनी पार पाडली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!