एमपीडीए मध्ये पसार असलेला आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे यास घेतले गुन्हेप्रकटीकरण पथकाने ताब्यात

हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे याला अमरावती येथून हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी पथक) ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त आरोपीची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास: नाव: आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे (वय ३० वर्षे) राहणार: संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा. दाखल गुन्हे: संशयिताविरुद्ध मेफेड्रॉन (एमडी […]

Read More

पुलगाव येथे वर्धा जिल्हा पोलिसांची मासिक गुन्हे आढावा बैठक पारडली

वर्धा जिल्हा पोलीस दलाची माहे ऑगस्ट-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक मंगळवार, दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी पुलगाव (जि. वर्धा) येथे पार पडली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवर पीपीटी (PPT) द्वारे […]

Read More

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वर्धा पोलिसांची कायदा-सुव्यवस्थेसाठी बैठक

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वर्धा पोलिस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक; ध्वनिप्रदूषण व लेझर लाईटवर कठोर निर्बंध वर्धा, ५ सप्टेंबर २०२६ : आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनिप्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी वर्धा पोलिस अधीक्षक कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. पोलिस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीत लाउडस्पीकर, […]

Read More

वर्धा पोलिसांची मोठी कारवाई: अल्पवयीन व विनापरवाना चालकांकडून १ कोटींहून अधिक दंड वसूल

वर्ध्यात अल्पवयीन व विनापरवाना वाहन चालकांवर पोलिसांची धडक कारवाई: ऑगस्ट महिन्यात १ कोटींपेक्षा जास्त दंड वर्धा जिल्ह्यात दुचाकी अपघातांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने ऑगस्ट महिन्यात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने अल्पवयीन मुलामुलींकडून चालवल्या जाणाऱ्या वाहनांवर आणि त्यांच्या पालकांवर विशेष […]

Read More

सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: ९ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना अटक

सेवाग्राम पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी कार पकडली असून, ९ लाख ९४ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. घटनेचा तपशील व कारवाई: दिनांक: ३ सप्टेंबर २०२६ ठिकाण: दत्तपूर येथील उड्डाण पुलाच्या बाजूला, पवनार कडून वर्ध्याकडे जाणारा सर्व्हिस रोड. कारवाई: […]

Read More

नागपुरातून सराईत NDPS तस्कराला शिताफीने अटक; वर्धा पोलिसांची मोठी कारवाई

वर्धा / हिंगणघाट: अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने एक मोठी कारवाई करत अमली पदार्थांच्या तस्करीत दीर्घकाळापासून फरार असलेल्या एका सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. राजेंद्र उर्फ लड्डू राजाभाऊ निकराड (वय ४१ वर्षे, रा. महेश नगर, स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागे, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. नागपुरात रचला सापळा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट […]

Read More

वर्धा पोलिसांची ‘वॉशआऊट’ मोहीम: १.०४ कोटींची अवैध दारू जप्त

वर्धा: जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि निर्मितीची साखळी समूळ नष्ट करण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाने २९ ते ३० ऑगस्ट दरम्यान विशेष ‘वॉशआऊट’ मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. २-दिवसांच्या या धडक कारवाईत पोलिसांनी १ कोटी ४ लाख ९५ हजार रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले. पहाटे ६ पासून एकाच वेळी छापेमारी पोलीस […]

Read More

हिंगणघाट: ५.७ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्जसह २२ वर्षीय तरुणाला अटक

हिंगणघाट (जि. वर्धा): स्थानिक पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोलीस निरीक्षक अनिल राऊत व गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाचे अंमलदार पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना, मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या खबरीवरून निशाणपुरा वार्ड परिसरात छापा मारून एका तरुणाकडून अमली पदार्थ (मॅफेड्रोन) जप्त करण्यात आला आहे. माहिती व पोलीस कारवाई: पोलीस पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून खात्रीशीर खबर मिळाली की, […]

Read More

हिंगणघाट येथे सेंट्रो कारने आलेल्या चोरट्याला अटक; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाट (वर्धा): हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (DB Team) बकरी चोरी प्रकरणी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीत वापरलेली सेंट्रो कार, कटर आणि रोख रकमेसह एकूण १,५५,८३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेचा संक्षिप्त वृत्तांत: चिकमोह (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील तक्रारदार श्रीकांत संजय सोरटे (वय २५ वर्ष) […]

Read More

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई: अट्टल चेन स्नेचर जेरबंद, २.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई: अट्टल चेन स्नेचर जेरबंद; २.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त, जुने गुन्हेही उघडकीस हिंगणघाट: हिंगणघाट शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला हिंगणघाट पोलिसांनी काही दिवसांतच बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, कपडे आणि चोरी केलेले सोने असा एकूण २,६४,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!