
“गांजा अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; केळझर येथे २ किलो ३८५ ग्रॅम गांजा चार जण जागीच जेरबंद!
वर्धा:
जिल्ह्यात अंमली पदार्थ बाळगणारे व त्यांची अवैध विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष धडक मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलूत मोठी कारवाई करत सव्वा लाखाचा गांजा जप्त केला आहे.

अशी झाली कारवाई:
पोलीस पथकाला मिळालेल्या खात्रीशीर खबऱ्याच्या आधारे, पोलीस स्टेशन सेलू हद्दीतील मौजा केळझर (यशवंत प्राथमिक शाळेमागे) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरात अचानक छापा (रेड) टाकला.

या घरझडतीदरम्यान प्रभाकर बंडु पवार व त्याचा भाऊ गजानन बंडु पवार हे दोघेही घरात हजर मिळून आले. घराची पंचांसमक्ष झडती घेतली असता तेथे अवैध गांजा अंमली पदार्थ आढळून आला. कसून चौकशी केली असता, हा गांजाचा माल त्यांचाच असून ते दोघे मिळून गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले.

मुख्य पुरवठादारांचेही नाव समोर:
पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आरोपींनी हा गांजाचा माल व्यंकट भाऊराव मोहिते व जनाबाई मोहिते (दोन्ही रा. शिवनगर, वर्धा) यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. हे चारही आरोपी संगणमताने आपापसात मिळून गांजाची तस्करी करून अवैधपणे विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात उघडकीस आले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व कायदेशीर कारवाई:
घटनास्थळीच जप्ती पंचनाम्याची कारवाई पूर्ण करून पोलिसांनी आरोपींच्या ताबյातून:

-
२ किलो ३८५ ग्रॅम गांजा (अमली पदार्थ)
-
जुनी किंमत अंदाजे १,१९,२५० रुपये इतка मुद्देमाल जप्त केला.

सदर प्रकरणातील चारही आरोपींविरोधात पोलीस स्टेशन सेलू येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलीस पथक:
सदर धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, रवि पुरोहित यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



