हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई; ७ ग्रॅम मॅफेड्रानसह दोन तस्करांना अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


वर्धा (हिंगणघाट): हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने एका कारवाईत ७ ग्रॅमहून अधिक वजनाचा ‘मॅफेड्रान’ (MD) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून कार आणि मोबाईलसह एकूण ३ लाख ३४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४:१५ ते ५:३० दरम्यान संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट येथे करण्यात आली.



गुन्ह्याची सविस्तर माहिती:



पोलीस स्टेशन: हिंगणघाट, जिल्हा वर्धा



आरोपींची नावे:

१. गणेश अनिल चिताडे (वय २८ वर्षे, रा. सेंट्रल वार्ड, हिंगणघाट, ह.मु. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट)



२. अविनाश सुरेशराव लांबे (वय ३० वर्षे, रा. सेंट्रल वार्ड, हिंगणघाट)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:



पोलीस पथकाने केलेल्या कायदेशीर झडतीत आरोपींकडून खालीलप्रमाणे ऐवज जप्त करण्यात आला:

मॅफेड्रान (अमली पदार्थ): ७.०९ ग्रॅम (किंमत अंदाजे ₹२९,९७०)

चारचाकी वाहन: हुंडाई कंपनीची सिल्व्हर रंगाची i20 कार (क्र. MH 02 CD 1976, किंमत ₹२,५०,०००)

रोख रक्कम: ५,००० रुपये (अमली पदार्थ विक्रीचे)

मोबाईल फोन: ३ युनिट्स (OnePlus 15, Oppo F31 Pro 5G, आणि Motorola Moto G54 5G – एकूण किंमत ₹५०,०००)

एकूण जप्त माल: ३,३४,९७० रुपये

कारवाई कशी झाली?

पोलीस स्टेशन हिंगणघाटचे डीबी पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, हिंगणघाट पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष वसंत पॅलेस रोड, हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वार्ड परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची व वाहनाची झडती घेतली असता हा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी आरोपींविरोधात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मार्गदर्शक व तपास पथक:

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि ज्ञानोबा पळनाटे, डीबी पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोना राजेश शेंडे, पोशि आशिष नेवारे व पोशि मंगेश वाघमारे यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!