अमरावती पोलिसांकडून आंतरजिल्हा दुचाकी चोर अटक; ५० हजारांची दुचाकी जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका दुचाकी चोराला अटक केली असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी वर्धा येथून चोरीला गेली होती.गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, लालखडी येथील एक व्यक्ती चोरीची सिल्वर रंगाची होंडा कंपनीची दुचाकी वापरत असल्याची गोपनीय माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली.ही यशस्वी कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त  यशवंत सोळंके पोलीस उपआयुक्त श्रीमती प्रांजली सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त  कैलास पुंडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

रंग बदलून लपवण्याचा प्रयत्न माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की आझाद नगर येथील एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी पैशांच्या व्यवहारात ही गाडी दिली होती. मूळ निळ्या रंगाची असलेली ही दुचाकी ओळखता येऊ नये म्हणून तिला सिल्वर रंग देण्यात आला होता. परंतु, व्यवहार पूर्ण झाल्यानंतर गाडी मूळ मालकाकडे परत करण्यात आली होती.



या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आझाद नगर, अमरावती येथून मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ती होंडा दुचाकी जप्त केली.

आरोपीचे नाव आणि जप्त मुद्देमाल



  • अटक केलेला आरोपी: दानीश अली वल्द जावेद अली (वय २७ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. आझाद नगर, अमरावती).

  • जप्त मुद्देमाल: अंदाजे ५०,००० रुपये किमतीची एक सिल्वर रंगाची होंडा कंपनीची दुचाकी.



गुन्ह्याची उकल आणि तपास जप्त केलेल्या वाहनाची अधिक माहिती काढली असता, सदर दुचाकी चोरीबाबत वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. अमरावती पोलिसांनी तातडीने याबाबात वर्धा पोलिसांशी संपर्क साधला. वर्धा शहर पोलिसांचे पथक अमरावतीत हजर झाल्यानंतर पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त केलेली दुचाकी त्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक:- या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सहा. पोहवा संभाजी केन्द्रे, पोहवा मंगेश लोखंडे, पो.हवा. नाझिमोद्दीन सैयद, पो.ना. सचिन भोयर, तसेच पोलीस अंमलदार रंजित गावंडे, सागर ठाकरे, नरेश मोहरिल, निखील गेडाम आणि चालक चेतन शर्मा व प्रभात पोकळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!