सिगारेटच्या वादातून देवळीत हत्येचा थरार: १ तासात ४ आरोपींसह अल्पवयीन ताब्यात

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


वर्ध्यात थरार: सिगारेटच्या वादातून देवळीत ४२ वर्षीय व्यक्तीची निघृण हत्या; अवघ्या १ तासात ४ आरोपी अटकेत, १ अल्पवयीन ताब्यात

देवळी (जि. वर्धा):वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात सिगारेट पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका निघृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना २ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १:०० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत गजानन किशोर पाटणकर (वय ४२ वर्षे, रा. देवळी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटना घडल्यानंतर देवळी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि तत्परतेने कारवाई करत अवघ्या एका तासाच्या आत चार मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या, तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.

धाब्यावरील वादातून गाठला मध्यरात्री काटा

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृतक गजानन पाटणकर आणि आरोपींचा काही तासांपूर्वी एका स्थानिक ‘मोहित धाब्यावर’ सिगारेट पिण्याच्या क्षुल्लक कारणावरून तीव्र वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली.



२ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गजानन पाटणकर हे आपल्या मित्राला सोडण्यासाठी इंदिरानगर परिसरात गेले असता, दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या दुचाकीला आडवे येऊन त्यांना थांबवले. गजानन यांना काही समजण्याच्या आतच आरोपींनी त्यांना पकडून ठेवले आणि त्यांच्यावर चाकूने एकापाठोपाठ एक सपासप वार केले. गंभीर दुखापत झाल्यामुळे गजानन यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.



अटक आरोपींची माहिती आणि दाखल गुन्हे

मृतकाचा भाऊ विक्की किशोर पाटणकर यांच्या तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी:
  1. अमन संतोष टेकाम (रा. देवळी)



  2. ओम रमेश सावरकर (रा. देवळी)

  3. प्रणय ज्ञानेश्वर राठोड (रा. देवळी)



  4. मनोज ज्ञानेश्वर राठोड (रा. देवळी)

  5. १ विधीसंघर्षग्रस्त बालक (कायद्यानुसार नाव गोपनीय)



देवळी पोलिसांची कौतुकास्पद व तत्पर कामगिरी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिक परिसरातून सर्व आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या ६० मिनिटांत त्यांना बेड्या ठोकल्या.

वैज्ञानिक व भौतिक पुरावे संकलित करण्यासाठी तात्काळ फॉरेन्सिक पथकाला (Forensic Team) घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून तपास पथकाला आवश्यक मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन व तपास पथक:  सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल (IPS), अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पुलगाव)  वंदना कारखेले आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील  प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ठाणेदार संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक कमलेश मगरे व देवळी पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी ही तत्पर कामगिरी बजावली असून, प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!