नुतन ठाणेदारांचा पदभार स्विकारताच जुगार अड्ड्यावर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नुतन ठाणेदार यांचा जुगार अड्डयावर छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात….

पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सण व लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलिस स्टेशन प्रमुखांना देण्यात आलेले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन पुलगाव येथे दोनच दिवसांआधी रुजु झालेले नुतन ठाणेदार राहुल सोनवणे यांनी पदभार सांभाळताच पो.स्टे हद्दीत स्टाफसह पेट्रोलिंग करीत असतांना दिनांक 14/03/2024 रोजी दुपारी 03/00 वा. दरम्याण उपस्थित पोलिस अंमलदार यांना गोपनीय माहीती मिळाली की मौजा नाचनगाव बाजार चौक येथील आम रोडवर काही ईसम जुगार खेळ खेळीत आहे अशा माहीती वरुन जुगारावर टाकला असता आरोपी





1) शेख अकील शेख आझाद वय 44 वर्ष रा. खडकपुरा नाचनगाव



2) आधार रामरतन भस्मे वय 30 वर्ष रा. सोरटा



3) राहुल दीलीपराव रावेकर वय 27 वर्ष रा खाटीकपुरा नाचनगाव

4) रविद्र बाबाराव गादे वय 44 वर्ष रा. गणेशनगर बोरगाव (मेघे) वर्धा

5) रवि अशोकराव रावेकर वय 40 वर्ष रा. खाटीकपुरा नाचनगाव

6) दिपक धनराज सोनोने वय 34 वर्ष रा. खडकपुरा नाचनगाव

7) आकाश राजु कैलुके वय 24 वर्ष रा. खडकपुरा नाचनगाव

हे 52 तास पत्याचा पैसे लावुन जुगार खेळतांना आढळुन आले वरील आरोपीतांचे ताब्यातुन एकुण 60600/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपीं विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहा.पोलिस अधिक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव  राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे ठाणेदार पोलिस स्टेशन,पुलगाव यांचे मार्गदर्शनात डी.बी पथकाचे पो.हवा. चंद्रशेखर चुटे, रविंद्र जुगनाके, अमोल जिंन्दे, उमेश बेले, रितेश गुजर यांनी केली आहे.

आजच्या कार्यवाहीच्या माध्यमातुन नुतन ठाणेदार यांनी पोलिस स्टेशन,पुलगाव हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन केले की आपआपले परीसरात कुठेही अवैध धंदे दिसले तर तात्काळ पोलिस स्टेशन,पुलगाव येथे संपर्क कराव आपले लगेच समाधान करण्यात येईल





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!