टोलवरील तोडफोड व जबरी चोरी प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथुन केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

तोंडगाव टोलनाका तोडफोड प्रकरणातील आरोपींना वाशिम ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद…

वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारीस आळा घालण्याकरीता समाजविघातक गुन्हेगारांविरुध्द प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता सर्व ठाणेदारांना आदेशित केले आहे.त्याअनुषंगाने दि.०८. जुलै २०२५ रोजी वाशिम हिंगोली महामार्गावरील ग्राम तोंडगाव फाट्याजवळील टोलनाक्यावर काही ईसमांनी धुडगुस घातला होता तसेच त्यांनी टोलवरील कर्मचारी व यातील फिर्यादी यांचे खिशातील ५,०००/-  रुपये जबरीने काढुन टोलवरील कर्मचाऱ्यात दहशत निर्माण केली. टोलनाक्यावरील बुधच्या काचा फोडुन ०४ लाख रुपयांचे नुकसान केले.





अशी तक्रार प्राप्त झाल्याने पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे अप.क्र. २२२/२५ क. ३०८,३०९(१) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळुन येत नव्हते फरार झाले होते.आरोपींच्या सदर कृत्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक काही काळ खोळंबुन त्यामुळे सामान्य नागरीकास त्रास होवुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींचा सतत शोध चालु होता परंत ते मिळुन येत नव्हते.



त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपासात  दिनांक १८.०७.२०२५ रोजी पो.नि. प्रदीप परदेशी स्थागुशा. वाशिम यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन आरोपी पकडणे करीता तात्काळ स्थागुशाचे पथक अकोला जिल्हयाते रवाना केले.व यातील आरोपी १) गजनन कुंडलिक वैरागडे, वय ४० वर्ष, रा.चिखली घुले २) उमेश सुधाकर टोलमारे, वय २५ वर्ष, रा. शिवाजी नगर, काटा रोड, वाशिम यांना निष्पन्न करुन , स्थागुशाचे पथकाने आरोपीचा शोध घेऊन आरोपी १) गजनन कुंडलिक वैरागडे, २) उमेश सुधाकर टोलमारे यांना शर्यतीचे प्रयत्न करुन ताब्यात घेवुन पो.स्टे. वाशिम ग्रामीण अप.क्र. २२२/२५ क. ३०८,३०९(१) वि.एन.एस. मध्ये तपास कामी व पुढील कायदेशीर कारवाई करीता पो.स्टे. वाशिम ग्रामीण यांचे ताब्यात दिले आहे.



सदर कारवाई पोलिस अधिक्षक अनुज तारे,अपर पोलिस अधिक्षक  लता फड, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी वाशिम नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. जगदीश बांगर व अंमलदार गजानन अवगळे, विनोद सुर्वे, सुरज खडके, आशिष बिडवे, गजानन गोटे, दिपक घुगे, विठ्ठल महाले, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे, सुनिल तायडे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्रीदेवी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल गंधे, पोशि अनिल बोरकर पो.स्टे. वाशिम ग्रामिण हे करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!