
सराफ दुकानात हातचलाखीने दागीने लंपास करणार्या महीलेस दागीण्यांसह युनीट १ ने २४ तासाचे आत केले जेरबंद…
शहरातील मध्यवर्ती भागातील महालक्ष्मी ज्वेलर्स येथून चालाखीने सोन्याचे दागीने चोरी करणार्या महीलेस २४ तासाचे आत चोरलेल्या दागीण्यांसह व चोरीच्या दागीन्यासह गुन्हे शाखा, युनिट ०१ ने घेतले ताब्यात…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ जुलै २०२५ रोजी पो.स्टे. सिटी कोतवाली येथे तक्रारदार गौरव राजकुमार कोटवानी, वय ३६ वर्षे, रा. सूरजनगर, शंकरनगर. अमरावती यांनी तक्रार दिली की यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे राजकमल ते अंबादेवी रोड, अमरावती येथे दुकान असून दि १८ जुलै २०२५ रोजी अंदाजे १२.३० वा. एक अनोळखी काळया रंगाचा बुरखा व ग्रे रंगाचा दुप्पटा परिधान केलेली, वय अंदाजे ४० ते ५० वर्षे, हिने ग्राहक असल्याचे भासवून दागीने दाखवावयास लावून, सेल्सगर्लचे लक्ष दूसरीकडे वळवून १) १ र्सोन्याचे २२ कॅरेट, पेंन्डट वजन २५.२१० ग्रॅम, २) १ र्सोन्याचे पेंन्डट, २२ कॅरेट वजन १५.८१० ग्रॅम, असा एकूण ४१.१ ग्रॅम वजनाचे, किंमत ३,८४,५९३/-रु. चे चालाखीने चोरून नेले.अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे अप क्र २५९/२०२५ कलम ३०३ (२) बि.एन.एस. प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास सुरु केली


सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांचे आदेशान्वये सदर गुन्ह्याचा संमातर तपास गुन्हे शाखेला करण्यास सांगीतले सदर गुन्ह्याचा तपासात गुन्हे शाखा, युनिट ०१ चे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळास भेट देवून घटनास्थळावरील सि.सि.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन यातील महीला आरोपी हीने स्वतःची ओळख लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही गुन्हे शाखा, युनिट ०१ यांनी तीला निष्पन्न करुन २४ तासांचे आंत सदर गुन्हयात आकोटफैल, अकोला येथून ताब्यात घेण्यात आले व तिच्याजवळून सदर गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागीने किंमत अंदाजे ३,८४,५९३/-रु.चे ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपासकामी जप्त मुददेमाल पो.स्टे. सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात आले आहे

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त अरविंद चावरीया,पोलिस उपआयुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ ,पोलिस उपआयुक्त (परि. २) . शाम घुगे, सहायक पोलिस आयुक्त (राजापेठ विभाग) जयदत्त भंवर सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा). शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, स.पो.नि. इम्रान नायकवडे, म. पोहवा. माधूरी साबळे, पोहवा फिरोज खान, सतीष देशमूख, सचिन बहाळे, प्रशांत मोहोड,अलीमउददीन खतीब, नाईक पोलीस शिपाई नाझीमउददीन सैयद, विकास गुढधे, सचिन भोयर, पोलीस अमलदार रणजीत गावंडे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, चालक- अशोक खंगार, किशोर खेंगरे, सर्व नेमणूक गुन्हे शाखा युनिट ०१ यांनी केलेली आहे.



