बांधकाम व्यवसाईकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगुन केली ६६ लाखाची फसवणुक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पु्णे-   शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगत एका टोळीने कंपनीला ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत विशाल कुमार भरत मांझी (वय २१ वर्षे, रा. लकरीखुर्द, सिवान, बिहार) यास अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी एका नामांकित
कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम
करतात. आरोपी विशाल कुमार भरत मांझी याने फिर्यादी
लेखापालास मोबाईलवर मेसेज करुन ‘मी कंपनीच्या
संचालकाचा मुलगा बोलत आहे. मी एका महत्त्वाच्या बैठकीत
असून, तातडीने पैसे पाठवा,’ असे सांगितले. त्यावर लेखापालाने कंपनीच्या अकाऊंटमधून आरोपीच्या तीन बँक खात्यात ६६ लाख ४१ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर लेखापालाने बांधकाम व्यावसायिकाच्या मुलास फोन करून पैसे पाठविल्याचे सांगितले. परंतु त्यांनी मी पैसे मागितलेच नसल्याचा खुलासा केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तात्काळ
पोलिसांत धाव घेतली. सायबर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल
क्रमांक, ई-मेल आयडी आणि बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. या तपासात आरोपी बिहार राज्यातील सिवान येथील असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपीला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!