पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील चिखली पोलिसांनी २४ तासात केला खुनाचा उलगडा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चिखली(पिंपरी-चिंचवड) सुनील सांभारे –  सवीस्तर व्रुत्त असे की   पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाअंतर्गत असलेले चिखली पोलिस स्टेशनमध्ये दि. ३०/०९/२०२३ रोजी सिराज अबुल हसन खान (धंदा-भंगार व्यवसाय, गट क्र. १६ कमाल वजनकाट्यासमोर कुदळवाडी) हा २८/०९/२०२३ या दिवशी बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा चुलता मिजाज अहमद अब्दुल हसन खान याने चिखली पोलिस स्टेशनला दिली होती. त्याअनुषंगाने चिखली पोलिस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर 200/2023 अशी तक्रार नोंद झाल्याने मनुष्य मिसिंग व्यक्तीचा तपास चिखली पोलिसांनी व.पो.नि. ज्ञानेश्वर
काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला. दुसऱ्या दिवशी चिखली पोलिसांनी हरवलेल्या सिराज बाबतची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. त्याचे जवळचे मित्र तसेच त्याच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोक यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तसेच या परिसरातील सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेज ची बारकाईने पाहणी करण्यात आली. यावेळी दि.२८/०९/२०२३ रोजी सिराज हा जायका चाय कुदळवाडी परिसरातून त्याचा मित्र सैफुद्दीन खान याच्यासमवेत दुचाकीवरून मोशीकडे जाताना दिसून आला. त्यामुळे सैफुद्दीन खान याच्याबद्दल संशय निर्माण झाल्याने चिखली पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याला चिखली पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली
दिली. याबाबत त्याच्याकडे सविस्तर माहिती विचारली असता त्याने सांगितले की, गेल्या दीड-दोन महिन्यापुर्वी सिराज व माझ्यामध्ये कंपनीचे भंगार घेण्यावरून वाद झाले होते त्यावेळी सिराजने मला दमदाटी करून कुदळवाडी परिसरात राहणाऱ्या मुलांना मारहाण करण्यासाठी पाठविले होते. त्यामुळे भविष्यात माझ्या जीवाला धोका होऊ शकतो यामुळे मी माझ्या ओळखीचा मुंबई येथे राहणारा मोहम्मद अनिस यास फोन करून बोलावून घेतले व दि.२८/०९/२०२३ रोजी सायं. ६ वाजण्याच्या सुमारास सिराज यास कुदळवाडी येथून जबरदस्तीने भंगार घेण्याचे खोटे कारण सांगून मोटरसायकलवर बसून चोलीकडून डी. वाय. पाटील कडे जाणाऱ्या रस्त्याच्या पच्छिम बाजूस असणाऱ्या मिलीटरीच्या ताब्यात असणाऱ्या जंगलात नेऊन त्याच्या डोक्यात हातोडीने घाव करून त्याचा खुन केला व मृतदेह जंगलात टाकल्याचे कबुली दिली.
चिखली पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सैफुद्दीन सांगत असलेली माहिती ची सत्यता पडताळण्याच्या हेतुने पोलिसांचे एक तपासपथक तक्रारदारासह सदर ठिकाणी गेले. सदरचा परिसर हा
मिलिटरीच्या एकदम अंतर्गत जंगल भागात असल्याने घटनास्थळ शोधण्यास पोलीसांना ४ तास वेळ लागला. सततचा पडणारा पाऊस, दलदल यामुळे मृतदेह कुझला होता. व त्याची दुर्गंधी परिसरात सुटली होती. मृत सिराजच्या कपड्यावरून व बाह्य दिसण्यावरून तक्रारदाराने मृतदेह सिराजचा असल्याचे ओळखले. त्यामुळे तात्काळ चिखली पोलीसांनी सैफुद्दीन व मोहम्मद अनीस याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सैफुद्दीनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे मोहम्मद अनीसच्याबाबत विचारणा केली असता तो काही व्यवस्थित माहिती सांगत नव्हता. मोहम्मदला ताब्यात घेणे गरजेचे असल्याने ते चिखली पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे होते. असे असताना चिखली पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक पिंजारी यांनी तांत्रिक विश्लेषण करून मोहम्मदचा फोन नंबर मिळवण्यात यश मिळवले. त्याआधारे मुंबईत जाऊन मोहम्मदला चिखली पोलीसांनी रितसर अटक केली. जर तात्काळ मोहम्मदला ताब्यात घेण्यात आले नसते तर तो उत्तर प्रदेशला पळुन जाण्याच्या तयारीत होता.या गुन्ह्याचा तपासकामी पो. उपायुक्त संदिप डोईफोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर अवघ्या २४ तासात दोन्ही आरोपींना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदरची कारवाई . विनयकुमार चौबे,  पोलिस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, पोलिस सह आयुक्त, वसंत परदेशी, अति. पोलिस आयुक्त,  संदिप डोईफोडे, पोलिस उपआयुक्त परीमंडळ ३, राजकुमार गोर, सहा.पोलिस आयुक्त, एमआयडीसी भोसरी विभाग व . ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पो.नि. तौफिक
सय्यद, पोलिस उपनिरीक्षक बारावकर, स.पो.फौ. ए.डी.मोरे, पो.हवा. शिंदे, प गर्जे, शिर्के, ताराळकर, सि.डी. सावंत, साकोरे, पो.ना.सुतार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!