कन्हान येथे अवैध कोळशाची साठवणुक करणाऱ्या विरोधात नागपुर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नागपुर ग्रामीण – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १२/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणचे पथक उपविभाग कन्हान अंतर्गत अवैध धंदयावर आळा घालणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोस्टे कन्हान हद्दीतील गहूहीवरा रोडवर नीलेश श्रीवास्तव नावाचा ईसम वेकोली कन्हान येथील कोळसा चोरून अवैधरित्या एन. एस
इन्टरप्राईजेस नावाचे बोर्ड लावून आपले जागेवर अवैधरित्या कोळसा साठा करून ठेवला आहे. अशा मिळालेल्या खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद घटनास्थळी रेड केली असता तिथे एक १४ चक्का ट्रक हा कोळशाने भरलेला  अवैधरीत्या विनापरवाना चोरीचा कोळसा विकण्याचे तयारीत असताना मिळून आल्याने ट्रक क्रमांक MP-28 H-1472 चा चालक याला नाव विचारले असता त्याने आपले नाव

सल्लाउद्दीन सैजाद हुसेन नागोरी,वय २६ वर्ष रा. ग्राम खोरीया सुमरा ता. मेहतपुर जि. उज्जैन म. प्र. कन्हान





असे सांगितले. त्याला ट्रक मध्ये असलेल्या कोळशाबाबत कागदपत्राची पाहणी केली असता कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगीतले. सदर कोळसा बाबत माहिती प्राप्त केली असता सदर कोळसा हा निलेश श्रीवास्तव नावाचा इसम राहणार खदान नंबर ०३ याने अवैधरित्या साठवून ठेवल्याचे समजले त्यांचे सोबत ट्रक चालकाचे मोबाईल वरून संपर्क केला असता त्याने त्याचे टाल वरून भरलेल्या कोळसा बाबत समाधान कारक उत्तर दिले नाही तसेच ट्रक मध्ये असलेल्या कोळशाबाबत कोणतेही कागदपत्र
सादर  केले नाही यावरून सदर कोळसा हा चोरीचा दिसून आल्याने आरोपीकडुन ४० टन कोळसा किमंती २,००,०००/- रू. व १४ चाकी ट्रक क्रमांक MP-28 H-1472 किंमती २०,००,००० / – रू असा एकुण २२,००,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीं यांची मेडिकल तपासणी करून जप्त मुद्देमालासह पोलिस ठाणे कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचे विरूद्ध ३७९, ३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलिस ठाणे कन्हान करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण  हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्री. संदीप पखाले साहेब यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  ओमप्रकाश
कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक बद्दलाल पांडे, सहायक फौजदार नाना राऊत, पोलिस हवालार विनोद काळे, गजू चौधरी, ईकबाल शेख, अरविंद भगत, प्रमोद भोयर, संजय बरोदीया, पोलिस नायक विरु नरड, पोलिस अंमलदार राकेश तालेवार चालक मोनू शुक्ला यांनी पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!