वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची अफलातून कामगिरी ३ खुनाचा २४ तासाच्या आत केला उलगडा वेगवेगळ्या जिल्ह्यातून १२ आरोपी घेतले ताब्यात..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की 

घटना क्रमांक -१ 





पो.स्टे.जऊळका हद्दीत दि.०९.१०.२०२३ रोजीचे १०.३० वा. ते ११.०० वा.दरम्यान मृतक दिलीप धोंडूजी सोनुने, वय ५३ वर्षे, व्यवसाय – शिक्षक, रा.शेलू फाटा मालेगाव, ता.मालेगाव, जि.वाशिम यांची आरोपींनी शेतीच्या वादातून पूर्ववैमनस्यातून ग्राम कोल्ही शिवारात डोक्यावर मारहाण करून त्यांचे अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले होते. यामध्ये दिलीप धोंडूजी सोनुने यांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय, वाशिम येथे मृत्यू झाला होता. सदर प्रकरणातील आरोपी



१) सतीश रामदास सोनुने व २) ज्ञानेश्वर रामदास सोनुने या



२) आरोपींना छत्रपती संभाजीनगर व हिंजवडी, पुणे

येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

घटना क्रमांक -२ 

त्याचबरोबर शेतीच्या मालकी हक्काच्या वादातून दि.११.१०.२०२३ रोजी सायंकाळी मयत गजानन उत्तम सपाटे यांनी ग्राम कार्ली शेत शिवारातील शेतीतील सोयाबीन काढून ते कट्टे गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ठेवले होते. सायंकाळच्या सुमारास छोटा हत्ती वाहन क्र.MH-37-T-1670 ने ग्राम कार्ली येथील आरोपी तेथे आले व त्यांनी शेतीचा वाद उकरून काढत मयतास लोखंडी रॉड, लाठी-काठी व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. मयत रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला पाहून आरोपींनी छोटा हत्ती वाहन क्र.MH-37-T-1670 मध्ये बसत तेथून पळ काढला. सदर प्रकरणाचा तपास करत असतांना त्यातील आरोपी नामे

१) नारायण सखाराम डुकरे,

२) मधुकर सखाराम डुकरे,

३) किसन सखाराम डुकरे,

४) नर्मदा सखाराम डुकरे,

५) सुवर्ता मधुकर डुकरे,

६) ज्योती किसन डुकरे,

७) चंदा नारायण डुकरे

या आरोपींना ग्राम कार्ली व हिंगोली येथून तपास पथकांनी ताब्यात घेतले.

घटना क्रमांक -३

अनसिंग येथील रहिवाशी शेख सलमान शेख बिस्मिला, वय २५ वर्षे, रा.अनसिंग याचा व्यवसायाच्या व पूर्वीच्या वैमनस्यातून दि.१३.१०.२०२३ रोजी आरोपी यांनी धारदार चाकूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्येश्याने त्याचा मृतदेह पुसद तालुक्यातील ग्राम उडदी शिवारात फेकून दिला होता. सदर प्रकरणातील आरोपी

१) सोहेल सलाम शहा,

२) उबेर पठाण अजीस पठाण,

३) नियामत खा लियाकत खा पठाण सर्व रा.अनसिंग

हे बाहेर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतांना नांदेड व अकोला परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

सदर खून प्रकरणातील आरोपींना घटना घडल्यापासून २४ तासांचे आत वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक करण्यात वाशिम पोलिस दलास यश प्राप्त झाले असून सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक .बच्चन सिंह (IPS), अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगरूळपीर श्रीमती नीलिमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे तपास पथक, पो.स्टे.जऊळका व पो.स्टे.अनसिंगचे प्रभारी अधिकारी व तपास पथक यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!