मित्र असावा तर असा,जामीनाचे पैसे जुळविण्यासाठी मुंबईवरुन अट्टल सोनसाखळी चोर बोलावून केला गुन्हा,आणि झाले पोलिसांचे सावज…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

भारती विद्यापीठ(पुणे शहर) सुनील सांबारे –

सवीस्तर व्रुत्त असे की  भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हददीत दि.१२/१०/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा चे सुमारास लेकटाऊन रोड बिबवेवाडी व कात्रज लेक येथे मॉर्नीक वॉक करणा-या फिर्यादी  वैशाली विठठल गलगली वय ५३ रा लॅण्डमालेकटाऊन बिबवेवाडी व
साक्षीदार मोहन श्रीपती शिवतरे रा वरखेडीनगर पुणे यांची चैन स्नॅचीग झालेवरुन त्यांनी दिल्या फिर्यादवरुन भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन ६५७/२०२३, भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ गुन्हे शोध पथकाने २२ सी सी टी व्ही ची पाहणी केला असता आरोपी





सागर संदीप शर्मा वय २० वर्षे रा एसआरए बिल्डींग,बिबवेवाडी रोड, पुणे



हा मुख्य आरोपीसोबत निष्पन्न झाल्याने व तो दि १७/१०/२०२३
रोजी तो त्याच्या परिसरात दांडीया कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील अंमलदार मितेश चोरमले, अभि चौधरी, अवधूत जमदाडे यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच त्यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे गुन्हेगार मित्र याचे जामीनासाठी ठाणे जिल्हा येथील चैन स्नॅचीग रेकॉर्डवरील आरोपी  प्रथमेश उर्फ पिल्या प्रकाश ठमके, वय २५ वर्षे,रा पाससेवाडी गणपती मंदीराजवळ, कोपरी ठाणे



तसेच आंबीवली खडकपाडा ठाणे यास व त्याचे साथीदारास बोलावून घेवून पुणे शहरात विश्रांतवाडी, येरवडा, भारती विद्यापीठ
व कोंढवा पोलीस स्टेशन हददीत अशा मिळून ०५ चैनस्नॅचीग केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याचेकडून वरीलप्रमाणे ०४ गुन्हयाची उकल करण्यात आली असून सदर आरोपी

सागर संदीप शर्मा वय २० वर्षे रा एसआरए बिल्डींग, बिबवेवाडी रोड, पुणे याचेकडून २२ ग्रॅम वजनाचे ( ०२ तोळे ०२ ग्रॅम
वजनाचे) ०१,१५,०००/-रुकिमंतीचे चोरीस गेलेले सोन्याच्या दोन चैन हस्तगत करण्यात आली आहे व सदर गुन्हयातील मुख्य आरोपी

प्रथमेश उर्फ पिल्या प्रकाश ठमके,वय २५वर्षे,रा पाससेवाडी गणपती मंदीराजवळ, कोपरी ठाणे व त्याचा साथीदार यांचा शोध सुरु
असून त्यांचकडून उर्वरीत मुददेमाल हस्तगत करणे बाकी आहे.

सदरची कामगिरी रितेश कुमार पोलिस आयुक्त पुणे शहर,संदीप कर्णीक ,सह-आयुक्त, पुणे शहर,.प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस
आयुक्त,पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदशनाखाली स्मार्तना पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०२ पुणे शहर, नारायण शिरगावकर, सहा. पोलिस आयुक्त,स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली  विनायक गायकवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पो स्टे,. विजय पुराणीक, पोलिस निरीक्षक गुन्हे, भारती विद्यापीठ पो स्टे गिरीश दिघावकर , पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि अमोल रसाळ, पोउपनि धीरजं गुप्ता, अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, महेश बारावकर,मंगेश पवार निलेश खैरमोडे,अवधूत जमदाडे,निलेश ढमढेरे,सचिन सरपाळे,अशिष गायकवाड,राहूल तांबे, हर्षल शिंदे,धनाजी धोत्रे,मितेश चोरमले, अभि चौधरी, अभि जाधव, विक्रम सावंत यांचे पथकाने केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!