दुचाकीवर अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा सापडला आमगाव पोलिसांच्या तावडीत….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

आमगाव(गोंदिया) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे  की, दिनांक 02/11/2023 रोजी पोलिस स्टेशन आमगांव चे पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांना कालीमाटी बिट अंतर्गत ग्राम नंगपुरा ते बंजारीटोला डांबरी रोडनी एक इसम बजाज कंपनीची पल्सरवर थैल्यात दारु वाहतुक करीत आहे अशी गोपनीय माहीती मिळाल्याने प्राप्त माहीतीच्या आधारे पोलिस स्टेशन आमगांव येथील पोलिस स्टाफनी कालीमाटी बिट मधील मौजा नंगपुरा ते बंजारी टोला जाणाऱ्या डाबरी रोडवर सापळा लावून नाकाबंदी दरम्यान सकाळी 05.00 वाजता दरम्यान अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा इसम  –

परमानंद आसाराम कटरे वय 41 वर्ष, रा. घोनसी ता. सालेकसा जि गोंदिया





यास मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची, मोटार सायकलची  पाहणी केली असता काळ्या रंगाची पल्सर क्र, MH 35 AM 4597 असुन त्याचे मोटार सायकलवर बांधलेले 3 थैले चेक केले असता



1) एका थैल्यात कागदी खर्डेची 3 बॉक्स त्यामध्ये 180 एम.एल. नी भरलेले देशी दारु फिरकी संत्रीचे एकुण 144 नग देशी दारूचे पव्वे प्रत्येकी किमती 70/- रूपये प्रमाणे एकुण 10,080/- रू.



2) दुसऱ्या थैल्यात कागदी खर्डेचा 3 बॉक्स त्यामध्ये प्रत्येकी 90 एम.एल.नी भरलेले देशी दारु फिरकी संत्रीचे 300 नग देशी दारूचे पव्वे प्रत्येकी किंमती 35/- रूपये प्रमाणे एकुण 10,500/- रू.

3) कागदी खर्डेची बॉक्स त्यामध्ये 90 एम.एल.नी भरलेले देशी दारु फिरकी संत्रीचे 300 नग देशी दारूचे पव्वे प्रत्येकी किमती 35/- रूपये प्रमाणे एकुण 10,500/- रू असा एकुण 31,080/- रुपये व मोटारसायकल पल्सर बजाज कंपनीची काळ्या रंगाची क्र. MH 35 AM 4597 मो.सा किंमत 70,000/- रु *असा एकुण 1,01,080/- रुपयाचा मुद्देमाल* बिना पास परवाना मिळुन आल्याने जप्त करुन आरोपी विरूध्द पो.स्टे आमगाव येथे अप क्र 373/2023 कलम 65 (अ), 65 (ई), 77 (अ) म.दा. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले..

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक . निखिल पिंगळे,  अप्पर पोलिस अधिक्षक  अशोक बनकर, गोंदिया कॅम्प देवरी,  उपविभागीय पोलिस अधिकारी  संकेत देवळेकर, देवरी अतीरिक्त कार्यभार उपविभाग आमगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युवराज हांडे पोलिस स्टेशन आमगांव, पोहवा. कुरसुंगे, पोशि. शेन्डे, उपराडे, कोडापे,  ननीर, अवथळे पोलिस स्टेशन आमगांव यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!