धाबामालकाचा खुन करुन पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कुही(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  कुही हद्दीत कुही फाटा राजु धाबा येथे दि. ११/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी

बिजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे





हा दिड ते दोन महीण्या पासुन राजु ढंगरे यांच्या ढाब्यावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे व फिर्यादी सोबत आरोपी



मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ वर्ष



हा ढाब्यावर पोळया करण्याचे व वेटर चे काम करत असे. आरोपी आदी वय २८ ते २९ वर्ष हा वेटरचे काम करत असे. तसेच जामकर नावाची महीला ही पोळी बनवायचे काम करीत असे. दिनांक ११/११/२०२३ रात्री ०१.०० वा. दरम्याण राजु ढंगरे यांनी जामकर या महीलेला तिच्या घरी सोडुन ढाव्यावर ०१.३० वा आपल्या कारने परत आले. तेव्हा आरोपींनी कामाच्या पैशाची मागणी केली असता मृतक नामे –

राजु भाउराव ढेंगरे वय ४८ वर्ष रा. उंद्री ता. उमरेड जि. नागपुर

हा दोन तिन दिवसात पैसे देतो असे म्हणाले असता आरोपी व मृतकात बाचाबाची झाली. मृतक हा आरोपीच्या खाटेवर जावुन झोपुन गेला. व आरोपी सुध्दा बाजुला जावुन झोपुन गेले. अंदाजे ०२.३० वा दरम्याण भांडे पडण्याच्या व मृतकाचा आवाज येत होता
जावुन पाहले असता मंडला आणि आदि हा राजु ढेंगरे यांना गळयात लंबी पट्टी बांधुन खिचत होते. त्या नंतर मंडलाने मृतकाला हातातील लाकडाने व चाकु सारख्या हत्याराने त्याच्या तोंडावर मारले व आदिने लाकडाने त्यांच्या डोक्यावर मारले व ते राजु ढेंगरे यांना खाटेवर लेटवुन त्यांच्या तोंडावर झाकुन राजु ढेंगरे यांची कार घेवुन तेथुन निघुन गेले. काही वेळानी त्यांचे गावातील नातेवाईक आले असता राजु ढंगरे हे मरण पावले होते. धाबा मालकाचा खुन करून मृतकाची अल्टो कार घेवून पळत असताना विहीरगाव शिवारात डीवायडरला धडकुन पलटी झाली त्यात दोन्ही आरोपी हे जखमी
अवस्थेत फरार झाले. फिर्यादीच्या रीपोर्ट वरून फरार आरोपीविरुध्द पो.स्टे. कुही गुन्हे रजि. नं. ७२० / २०२३ कलम
३०२, ३४ भादवि अन्वये खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार (भा.पो.से.) यांनी पोलिस स्टेशन कुही येथील १ व  स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ०३ विशेष पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. दिनांक १३/११/२०२३ रोजी सदर खुनाच्या गुन्हयाचे समांतर तपासा दरम्यान वरिष्ठांचे  आदेशानुसार सदर गुन्हा अत्यंत गुंतागुंतिचा असल्याने व गुन्हयातील आरोपीची काहीही ओळख नसल्याने तसेच मृतक हा राजकीय पार्श्वभूमीचा असल्याने गुन्हा उघडकीस यावा या करिता आरोपींचा लोकल cctv फूटेज, रेल्वे स्थानक परिसर, कॉटन
मार्केट, एम पी बस स्टॉप नागपूर इत्यादी ठिकाणी शोध घेऊन मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे तसेच तांत्रिक तपासा दरम्यान फरार आरोपी इसम

१) विशेष कुमार रामदास रघुवंशी वय ३३ रा. कोडवन मडला मध्यप्रदेश
२) आदी चंद्रामनी नायक, वय ३० वर्ष, रा. बनपल्ली ओडीसा

यांना त्यांचे राहते गाव मंडला मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली असता त्यांनी आपल्या केलेल्या गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून पोस्टे कुही यांच्या ताब्यात दिले. सदर गुन्हयाचा तपास कौशल्य पूर्वक करून अवघ्या ७२ तासाचे आत उघडकीस आणला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने  सहायक पोलिस
अधीक्षक आशित कांबळे हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही  पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण . हर्ष ए. पोद्दार  (भा.पो.से) तसेच अपर पोलिस अधीक्षक डॉ.  संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी उमरेड विभाग  राजा पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलिस स्टेशन कुही येथील प्रभारी ठाणेदार  नितेश डोर्लीकर, पोस्टे उमरेडचे पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, सहायक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिष ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखाडे, बटुकलाल पांडे,विशेष तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक  देविदास ठमके, पोलिस हवालदार, अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मयूर ढेकले, विनोद काळे, इक्बाल शेख, पोशी राकेश तालेवार, नापोशी मनीष भुते चापोशी आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे, व विशेष तांत्रिक मदत पोशी मृणाल राऊत
यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!