पेट्रोलिंग दरम्यान सापडलेली संशयीत वाहने स्थानिक गुन्हे शाखेने केली जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २६/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहर परिसरात रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक व पेट्रालींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मेन लाईन नगर परिषद जवळ दोन ते तिन इसम उभे असून त्यांचे जवळ सुझुकी अॅसेस कंपनीच्या दोन व होंडा कंपनीची एक अॅक्टीव्हा अशा गाडया असुन त्या चोरीच्या असल्याची शक्यता आहे. त्यावरुन क्षणाचाही विलंब न करता स्थागुशा कडील पथकाने खातरजमा करण्याकरीता नगर परीषद परीसरात जावुन पाहणी केली असता तिन इसम हे दुचाकी
वाहनासह संशयास्पदरित्या वावरतांना आढळुन आल्याने पथकाचे  मदतीने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे

१) मोहम्मद रिजवान मोहम्मद अबरार वय २२ वर्ष रा. कळंब चौक कुंभारपुरा यवतमाळ





२) रुमान कुरेशी असलम कुरेशी वय १९ वर्ष रा. कळंब चौक कुंभारपुरा यवतमाळ



३) मो.अश्फार मो. असलम मलनस वय ३३ वर्ष रा. तेलीपुरा, यवतमाळ



असे सांगीतल्याने त्यांना त्यांचे ताब्यात असलेल्या सुझुकी अॅसेस कंपनीच्या दोन व होंडा कंपनीची एक अॅक्टीव्हा या वाहनांचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली व सदर वाहनांचे कोणतेही पुरावे सादर केले नाही त्यावरुन तिन्ही गाड्या एकुण किंमत २,७०,०००/- रुपयाच्या जप्त करुन नमुद इसमांविरुध्द पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे महाराष्ट्र
पोलिस कायदा कलम १२४ अन्वये कारवाई नोंद करण्यात आली. सदर तिन्ही वाहनासंबंधाने पुणे, नांदेड व कारंजा, जि. वाशिम येथे वाहन चोरी संबंधाने कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक,  पियुष जगताप, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ  आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष मनवर, पोलिस अंमलदार योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, आकाश सहारे, विवेक पेठे
सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!