
कत्तलीसाठी चोरी केलेल्या गोवंशीय जनावरांना अकोला LCB ने दिले जिवनदान,२ आरोपी अटकेत…
स्थानिक गुन्हे शाखा कडुन अवैध गोवंश चोरी करून टाटा व्हिस्टा कारमथुन वाहतुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ०२ जिवंत गोवंशाना जिवनदान देऊन एकुण २,२७,७०० रु. चा माल केला जप्त…
अकोला(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयामध्ये गोवंश चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधीक्षक, संदिप घुगे अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक, शंकर शेळके यांना मार्गदर्शक सुचना देवुन जिल्हयातील गोवंश चोटीचे गुन्हे उघड किस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्त्या त्याअनुषंगाने आज दिनांक – ०६.१२.२०२३ रोजी गोपनिय माहिती मिळाली कि, वाशिम बायपास परीसरातील हुसैनी शॉप च्या पाठीमागे एका


पांढ-या रंगाच्या टाटा व्हिस्टा एम एच २०, डी एफ ०३११ या वाहनामध्ये पातुर परीसरातुन गोवंश चोरीकरून येत आहे. अशा माहिती वरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचुन कार्यवाही केली असता तेथे एक पांढ-या रंगाची टाटा व्हिस्टा कार ज्यामध्ये गोवंश जातीचे ०१ गाय व ०१ कालवड असे निर्दयीपणे कोंबुन सदर जनावरे कारमधुन काढतांना ०२ इसम १) शेख सोहेल शेख युसुफ, वय २८ वर्षे, रा. भारत नगर, अकोट फाईल, अकोला. २) एजाज शाह युनुस शाह, वय ३८ वर्षे, रा. भगतवाडी, अकोला असे मिळुन आल्याने सदर जनावरावे मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचे गोवंश पातुर परीसरातुन चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेवून व सदरचे जनावरांची वैद्यकिय उपचार करून तात्पुरत्या चारापाण्याची व्यवस्था करून सदरचे आरोपी व वाहने पो.स्टे. पातुर यांच्या ताब्यात दिले. पो.स्टे. पातुर येथे अप नं. ५४० / २३, कलम ३७९ भादंवि दाखल असुन सदर गुन्हयातील ०२ गोवंश व ०१ टाटा व्हिस्टा कार असा एकुण २,२७,७०० रु. चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे,पोलिस निरीक्षक, शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, रापोउपनि दशरथ बोरकर, पोहवा उमेश पराये, गोकुळ चव्हाण, नापोशि खुशाल नेमाडे, पोशि आकाश मानकर, गोहम्मद अमिर, अन्सार शेसा,लिलाधर खंडारे, अभिषेक पाठक, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, चालक पोशि अक्षय बोबडे यांनी केली आहे.



