
अवैध शस्त्रासह पुसद ग्रामीण पोलिसांनी केले एकास जेरबंद…
नुतनवर्षाच्या पुर्व सध्येला पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण हददीतील अग्नीशस्त्र (गावठी बनावटी रिव्हॉल्व्हर) बाळगणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई, यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अवघड गुन्हे, आरोपी शोध,अवैध अग्नीशस्त्र, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या..
यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्त व्रुत्त असे की दिनांक 31/12/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण मौजे बोरी ईजारा येथे राहणारा इम्रान खान यांच्याकडे अग्नीशस्त्र (गावठी बनावटी रिव्हॉल्व्हर) असून तो 31 डिसेंबरच्या पुर्व संध्येला दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता असून तो त्याचे घरी बोरी ईजारा ता. महागांव येथे थांबला आहे. अशी गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने दोन पंचासह बोरी ईजारा येथे रवाना होवून त्यास त्याचे घरातुन ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर जप्त करुन ताब्यात घेतली. सदर देशी बनावटीची
रिव्हॉल्व्हर कोणाकडून आणली याबाबत विचारपूस केली असता ती अमजद खान व सरदार खान दोन्ही रा. अरुण ले आउट, उमर फारुख शाळेजवळ वसंतनगर पुसद ता. पुसद यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले. पुढील कारवाई करीता आरोपी इम्रान खान अहमद खान वय 29 वर्षे रा. बोरी ईजारा ता. महागांव जि. यवतमाळ यास व जप्त मुददेमाल देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन गजभारे, अमोल सांगळे, चापोउपनिरी रेवन
जागृत, पोहवा सुभाष जाधव, तेजाब रणखांब, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज, सर्व स्थानिक
गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.




