
गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करणारे अखेर अकोला पोलिसांचे ताब्यात…
गस्तीवरील पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….
अकोला (प्रतिनिधी)- चार तरुणांनी गस्तीवरील पोलिस पथकाच्या दिशेन हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच काही दिवसांपुर्वी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याअंतर्गत मांजरी-कंचनपूर मार्गावर (दि.३० डिसेंबर २०२३) रोजी घडली होती. दुचाकीवरून फिरत असलेल्या चार संशयित तरुणांनी हा गोळीबार केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलिस थोडक्यात बचावले. घटनेनंतर पोलिस पथकाने आरोपींचा पाठलाग केला, मात्र ते दुचाकीवरून फरार झाले होते.


उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हातरूण आणि मांजरी भागात पोलिस हे चारचाकी पोलिस वाहनातून गस्त घालत होते. यावेळी कंचनपूरकडून दोन दुचाकी येत होत्या. पोलिसांचे वाहन पाहताच दुचाकीचालक वाहन वळवून पळू लागले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करीत असल्याचे पाहून दुचाकीवरील तरुणांनी पोलीस वाहनाच्या दिशेने हवेत गोळीबार केला. गोळीबारातील काडतूस पोलिस वाहनाच्या जवळून गेले. गोळीबारात पोलिस थोडक्यात बचावले. त्यानंतरही पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग सुरू ठेवला. मात्र ग्रामीण भागातील रस्ता खराब असल्याने पोलिसांना मात्र लांबपर्यंत दुचाकीचा पाठलाग करता आला नाही. या सदर गुन्ह्यात आरोपींना पोलिसांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राचा वापर करून गोळीबार केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने कलम ३०७ भा.दं.वि वाढविण्यात आला आहे.

जिल्हयात पहिल्यांदाच पोलिसांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराचे घटनेचे जिल्हयात तसेच राज्याच पडसाद उमटून विविध चर्चांना उधान आल्याने गुन्हेगार यांना जेरबंद करने जिल्हा पोलिसांना आव्हान ठरले होते. घटना घडल्या पासून स्थागुशा यांचे एक पथक हे पोलिस स्टेशन उरळ व परिसरात गोपनीय माहीती संकलीत करीत होते. नवनियुक्त पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून घटनेच्या ठिकाणी (दि.१३जानेवारी) रोजी सकाळी १०:०० वा भेट देऊन गोळीबार झालेल्या ठिकाणी अधिकारी आणि अंमलदार यांना सुचना देवून आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्या बाबत आदेशीत केले. तसेच सदर गोळीबार करणा-या घटनेची माहीती जो कोणी देणार त्यास २५,०००/-रू. बक्षीस जाहीर केले होते. पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा व स्थानीक गुन्हे शाखेला प्राप्त झालेल्या गोपनीय माहीतीची खातरजमा करून याच वेळे पासून कार्यवाही सुरू केली. ज्यात ०४ अधिकारी आणि २८ अंमलदार यांनी सहभाग घेतला. रात्री १०:०० वाजता सुरू झालेली शोध मोहीम दरम्यान ग्राम हातरून, नखेगाव, नेर थामना, शेगाव, वाशिम जिल्हयातील रिसोड येथून गुन्हा करणारे आरोपी नामे

१) अश्विन गणेश मुंडे (वय २१ वर्षे) रा. ग्राम नखेगाव
२) भावेश उर्फ अर्जुन रविंद्र मुंडाले (वय १९ वर्षे), रा. ग्राम नखेगाव. ह.मु. हातरून विटाचे भट्यावर
३) सागर ज्ञानेश्वर चौके (वय २५ वर्षे),रा. ग्रामनेर धामना.
४) अविनाश भिमराव मुंडाळे (वय २६ वर्षे)रा. ग्राम नखेगाव
५) योगेश रामराव मुंडाळे (वय २६ वर्षे) रा.नखेगाव
यांना ताब्यात घेवून, त्यांना खाकीचा हिसका दाखवताच आरोपींनी घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे सहा. पोलिस अधीक्षक गोकुळ राज यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थागुशा अकोला, सपोनि. कैलास डी. भगत, पोउपनि. गोपाल जाधव स्थागुशा.पो. अंमलदार भास्कर धोत्रे, रविंद्र खंडारे, सुलतान पठाण, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, अविनाश पाचपोर, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, विशाल मोरे, भिमराव दिपके, स्वप्नील खेडकर, सतीष पवार, चालक नफीज शेख, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, तसेच सायबर सेल चे आशिष आमले तसेच नखेगाव य नेर गाव हे पोलिस स्टेशन दहीहांडा हद्दीत येत असल्याने तेथील ठाणेदार योगेश वाघमारे व ०८ अंमलदार आदींच्या सहकार्याने केले.


