
पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांची ३६ वी कार्यवाही, हिंगोली येथील सराईत गुंड खंडेराव यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द….
शरीराविरुध्दचे व मालाविरुध्द सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्या अंतर्गत एक वर्षा करीता केले स्थानबद्ध…
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्ताव नुसार मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर सराईत गुन्हेगारा बाबत एमपीडीए अंतर्गत सलग ३६ वी कार्यवाही.


पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली यांनी जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भूमिका घेवुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इत्यंभूत माहिती काढुन ते करत असलेल्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रक्रीया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.

धोकादायक इसम

खंडेराव विठ्ठलराव भेंडेकर वय ३५ वर्ष व्यवसाय मजुरी रा. पार्टी सावळी ता. औंढा नानगाथ जि. हिंगोली
यांचेवर मागील अनेक वर्षापासुन हिंगोली व परभणी जिल्हयातील पोलिस स्टेशन. औंढा नागनाथ, वसमत ग्रामीण, जि. हिंगोली पोस्टे जिंतुर येथे गंभीर स्वरुपाचे मालाविरुध्दचे व शरीराविरुध्दचे एकुण नऊ (०९) गुन्हे दाखल असुन तो सतत गुन्हे करीत होता. तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्याचे कृत्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भिती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक इसम बनला होता. म्हणुन मा. पोलीस अधीक्षक, यांचे आदेशाने सदर प्रकरण पोलिस निरीक्षक जी.एस. राहीरे, पो.स्टे. औंढा नागनाथ यांनी एस.एस. दळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग हिंगोली ग्रामीण यांच्या मार्फतीने नमुद इसमा विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबतचा अधिनियम १९८१ (एम.पी.डी.ए.) चे कलम ३ (१) अन्वये कार्यवाहीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांच्या कडे सादर केला होता. पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या कडे पाठविला होता.
मा. जिल्हाधिकारी, हिंगोली श्री जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करुन नमुद धोकादायक इसम खंडेराव विठ्ठलराव भेंडेकर वय ३५ वर्ष व्यवसाय मजुरी रा. पार्टी सावळी ता. औंढा नानगाथ जि. हिंगोली हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरुन धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्यास एम.पी.डी.ए. १९८१ (सुधारणा १९९६,२००९ आणि २०१५) कलम ३ (२) अन्वये एक वर्षाकरीता कारागृहात स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असुन पुढील कार्यवाही सुरु आहे.


