
SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला अवैधरित्या विनापरवाना शहरात येणारा दारुसाठा….
वर्धा शहरात येणारी विदेशी दारू उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडली,चारचाकी वाहनांसह 6,87,850/- रू चा मुद्देमाल केला जप्त….,
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही मुख्यत्वे करुन शहरात येणारा दारुसाठा याबाबतीत पोलिस अधिक्षकांनी जातीने लक्ष घालुन तशा सुचना सर्व प्रभारी यांना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि. 29.01.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील विशेष पोलिस पथक हे वर्धा उपविभागीय कार्यालयात कार्यलयीन काम कामकाज करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम दारुसाठा घेऊन येत असुन तो रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत गजानन नगर
वैद्य लेआउट, आर्वी नाका वर्धा येथे येत असल्याचे माहीती वरुन घरासमोर नाकेबंदी करून मिळालेल्या माहीतीप्रमाणे यातील ईसम अविनाश रमेशराव वैद्य हा असल्याचे कळताच त्याचे घराचे जवळ संध्याकाळी 6 ते 7 वा चे दरम्यान. वार्ड न. 6 ,वैद्य लेआउट, गजानन नगर, वर्धा येथे वर प्रोव्हीशन रेड केला असता त्यांचे ताब्यातुन


1 )एक जुनी वापरलेली पांढऱ्या रंगाची चारचाकी होंडा सिटी कंपनीची झेड एक्स क्र एम. एच. 31 सी. एन. 8847 किंमत
6,00,000/- रू

2) 7 खरर्डयाचे खोक्यामध्ये रॉयल स्टॅग कंपनिच्या ऑफीसर चाईस ब्लु, ऑफीसर चाईस, ओल्ड मंक कंपनीच्या अशा वेगळया कपंनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या 87850/-₹

असा एकुन किंमत6,87,850/- ₹ चा मुद्देमाल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला
सदरची विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता सदर विदेशी दारूचा माल हा नागपुर येथील अमरावती हायवे रोड वरील पि.व्ही. के वाईन शॉप मधुन आणला आहे सदर वाईन शॉपचे मालक यांचे नाव माहीती नाही असे सांगीतल्याने पि.व्ही. के वाईन शॉप चे मालक यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपीस दारूचा माल
देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म. दा. का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने सदर गुन्हयात वाईन शॉपचे मालक
यांना आरोपी बनविण्यात आले आहे.यावरुन सदर आरोपीविरोधात
पोलिस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 61 / 2024 कलम 65 अ ई, 77 अ, 82 83, म. दा. का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलिस अधिकारी कर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन ,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतन कवडे याचे विशेष मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि संजय गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो. शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीरशेख, रवि नरूले, सुमेश शेंद्ररे यांनी यशस्वी रित्या पार पाडली.


