
उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाने पकडला अवैधरित्या शहरात येणारा दारुसाठा…
उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत पकडला वर्धा शहरात येणारा अवैध दारुचा साठा…
वर्धा(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक 05.02.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलिस पथक हे उपविभाग वर्धा येथील परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की वार्ड न. 1 पाण्याचे टाकी जवळ बोरगाव मेघे, वर्धा एक ईसम येथे त्याचे घरासमोर दारुसाठा घेऊन येतोय त्यानुसार नाकाबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता यातील आरोपी


1) रंजीतसिंग उपेन्द्रसिंग थुरवाल वय 23 वर्ष

2 )विधीसंघर्षीत बालक दोन्ही रा. वार्ड न. 1 पाण्याचे टाकी जवळ बोरगाव मेघे, वर्धा जि. वर्धा यांचे ताब्यातुन

1) एक काळया लाल रंगाची हीरो होन्डा कंपनीची फॅशन दुचाकी वाहन क्रमांक एम. एच. 32 आर 3180 अंदाजे किंमत 70,000/- रू व त्या दोघाचे मधात प्लॉस्टीकचे पिशवीमधे मध्ये रॉयल स्टॅग ऑफीसर चाईस ब्लु, ऑफीसर चाईस, देशी दारू, टुबर्ग, कपंनीच्या दारूच्या अश्या वेगवेगळया कपंनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा एकुन 98,100 /- रू चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्त करण्यात आला
2) तसेच आरोपीतांनवर हनुमान नगर, वर्धा येथे त्याचे घरासमोर नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता यातील आरोपी
1) वेदांत जितेन्द्र गडकरी वय 20 वर्ष
2) पारीकेत विजय खडसे वय 22 वर्ष दोन्ही रा. वार्ड न. 29
हनुमान वर्धा जि.वर्धा
यांचे ताब्यातुन 1) एक काळया रंगाची निळा पटटा असलेली हीरो होन्डा कंपनीची स्पेलेन्डर दुचाकी वाहन क्रमांक एम.एच. 32 सी. 3669 अंदाजे किंमत 50,000/- रू व त्या दोघाचे मधात प्लॉस्टीक चुंगडी मध्ये रॉयल स्टॅग, ऑफीसर चाईस ब्लु, ऑफीसर चाईस, देशी दारू, टुबर्ग, कपंनीच्या दारूच्या अश्या वेग-वेगळ्या कपंनीच्या विदेशी दारूच्या शिश्या असा एकुन की 1,15,500/- रू चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.
दोन्ही गुन्हयातील आरोपींना सदरची विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली
असता विदेशी दारूचा माल हा सावंगी आसोला जि. नागपुर हायवे रोडवरील Leopold – 9 नावाने असलेल्या रेस्टॉरेन्ट व बार चे चालक/मालक नयन चिंतलवार पत्ता सावंगी आसोला जि. नागपुर यांचे बार मधुन आणला आहे. वरून आरोपी नयन चितंलवार रा. सावंगी आसोला नागपुर यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हयात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपीतांन दारूचा माल देवुन त्यांना सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म. दा. का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने दोन्ही गुन्हयात आरोपी बनविण्यात आले आहे.पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीतांविरूध्द 1) अपराध क्रमांक 207 / 2024 कलम 65 अई, 77 अ,82 83 म. दा. का. सहकलम 3 (1) 181, 130 / 177 मो.वा.का. 2) अपराध क्रमांक 208 / 2024 कलम 65 अई, 77 अ, 82, 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181, 130 / 177मो.वा.का.अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर येथील पोलिस अधिकारी कर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नुरूल हसन ,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद के मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि संजय गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो. शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, रवि नरूले, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.


