सालेबर्डी भंडारा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सालेबर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी महेश सुरज गजभिये  यास जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा….

भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील मृतक- विनोद परमानंद बागडे वय-42 वर्ष रा.सालेबर्डी याचा कुत्रा आरोपीचे घरी गेल्याने आरोपीचे घरच्यांनी कुत्र्याला मारल्यामुळे मृतकाने तु माझ्या कुत्र्याला का मारला असा जाब विचारला असता आरोपीचे व मृतकाचे भांडण झाले. त्यामध्ये आरोपीने रागाच्या भरात घरातील लोखंडी रॉड आणुन मृतक विनोद परमानंद बागडे
याचे डोक्यावर मारुन जिवानीशी ठार मारले. पतीला मारपीट होत असल्याचे पाहुन मृतकाची पत्नी सौ. प्रियंका विनोद बागडे वय 35 वर्ष रा. सालेबर्डी ही पतीच्या मदतीला धावुन आली असता आरोपीने रागाच्या भरात तोच लोखंडी रॉड मृतकाचे पत्नीच्या डोक्यावर मारुन तिला सुद्धा जिवानीशी ठार मारले.
तत्कालीन ठाणेदार सहाय्यक पोलिस निरिक्षक देवराव लांबाडे  पो.स्टे. कारधा यांनी आरोपीला अटक करुन न्यायालयासमोर पेश केले व गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदर खटला मा. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय सि.एल.देशपांडे , भंडारा यांचे न्यायालयात चालु होता





सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता व्हि.बी.भोले  यांनी सदरचे प्रकरण गांभीर्याने घेवुन आरोपीविरुद्ध साक्षपुरावे घेण्यात आले. यातील मृतकाची मुलगी कु. खुशबु विनोद बागडे वय 5 वर्ष हीने आरोपीला तिचे आई-वडीलांना जिवानीशी ठार मारतांना पाहीले असुन मा. न्यायलयात तिची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी अभियोक्ता श्री.व्हि.बी.भोले यांनी सदर प्रकरणात ईतर साक्षपुरावे पडताळणी केले असुन फॉरेन्सिक अहवालावरुन आणि वैद्यकीय अहवालाची योग्य प्रकारे मांडणी करुन आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल अशाप्रकारे कौशल्यपुर्ण मांडणी करुन आरोपीस शिक्षा होण्यास महत्वाची भुमीका बजावली व त्यामध्ये पैरवी अधिकारी पोहवा. सुकरु वल्के पो.स्टे. कारधा यांनी वेळोवेळी सदर खटल्यातील कामकाजात मदत केली मा. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय सि. एल. देशपांडे  भंडारा यांनी मृतक (1) विनोद परमानंद बागडे याला जिवानीशी ठार मारल्यावरुन आरोपीला जन्मठेप व 2000/- रुपये आर्थीक दंडाची शिक्षा, मृतक (2) सौ. प्रियंका विनोद बागडे हीला जिवानीशी ठार मारल्यावरुन आरोपीला जन्मठेप व 2000/- रुपये आर्थीक दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.



सदर प्रकरणात सरकारी अभियोक्ता व्हि.बी.भोले यांनी सरकार पक्षाकडुन योग्य बाजु मांडुन पोलिस अधिक्षक भंडारा लोहीत मतानी, अपर पोलीस अधिक्षक भंडारा  ईश्वर कातकडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा डॉ.अशोक बागुल, पो.स्टे.कारधा ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात पोहवा. सुकरु वल्के  पोलिस स्टेशन कारधा यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज केले.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!