
उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल…
उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल…
गोंदिया (प्रतिनिधी) – उद्या 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वा.सू. (डी. बी. सायन्स कॉलेज, गोंदिया) येथे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल, यांच्या 118 व्या जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगदीप धनखड़ उप-राष्ट्रपती, भारत सरकार, यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात येणाऱ्या कार्यक्रम आणि जिल्हा दौरा प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि ईतर मान्यवर मंत्री महोदय, खासदार, आमदार आणि गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या वेळी गोंदिया-भंडारा क्षेत्रांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ सोहळा संपन्न होणार आहे. या सोबतच बहुप्रतिक्षित असलेल्या मेडिकल कॉलेजचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडणार आहे.


अतिमहत्वाच्या व्यक्ती दौरा प्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, कॅम्प नागपूर यांचे आदेशान्वये सदर दौरा कार्यक्रमा दरम्यान सर्व राजशिष्टाचाराचे पालन व कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करणे अति आवश्यक असल्याने पोलीस आधिक्षक, गोंदिया निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली अति महत्वाचे व्यक्तींचे संरक्षण कायदा सुव्यवस्था सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

तैनात पोलीस बंदोबस्त पुढीलप्रमाणे –

1) बाहेर जिल्हयातील एकूण पोलिस अंमलदार- 700
2) बाहेर जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकारी एकूण – 4 एसपी दर्जाचे, 8 डीवायएसपी दर्जाचे 11 पोलिस निरीक्षक, 60 सपोनि/ पोउपनि
3) बाहेर जिल्ह्यांतील राज्य राखीव दलाची – 1 कंपनी
4) गोंदिया जिल्हा पोलिस दलातील एकूण पोलीस अंमलदार – 800
5) गोंदिया जिल्हा पोलिस दलातील एकूण पोलीस अधिकारी – 70
6) गोंदिया जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी -.अपर पोलिस अधीक्षक – 1, डीवायएसपी – 3
7) श्वान पथके – 4
8) एकूण बॉम्ब शोध व नाशक पथके – 8
अशा प्रकारे अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्ताची विभागणी करण्यात आलेली असून बिर्सी विमानतळ, डी.बि सायन्स कॉलेज सभा स्थळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भूमिपूजन सोहळा कार्यक्रम स्थळ कुडवा, एम आय ई.टी. कॉलेज, रोड पॉईंट बंदोबस्त, याप्रमाणे बंदोबस्ताची विभागणी क्रमाप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांना नेमून अती महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने तगडा पोलिस बंदोबस्त असणार आहे.
वाहतूक मार्गात बदल –
1) सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे.
2) बालाघाटकडून रावणवाडी मार्गे आमगाव कडे जाणारी जड-अवजड वाहतुक कोरणीघाट-चंगेरा-बनाथर-छिपिया- भद्रुटोला-कटंगटोला-बडेगाव-कामठा-कालीमाटी-आमगाव मार्गे वळविण्यात आली आहे.
3) बालाघाटकडून गोंदिया ते तिरोडा कडे जाणारी जड-अवजड वाहतुक बालाघाट-खैरलांजी – परसवाडा टी पाईंट- करटी-तिरोडा या पर्यायी मार्गाने वळविली आहे.
4) आमगावकडून गोंदिया ते तिरोडा कडे जाणारी जड-अवजड वाहतुक पतंगा चौक-कारंजा-गोरेगाव-कुऱ्हाडी बोदलकसा-सुकळी-सुकळीफाटा-तिरोडा या पर्यायी मार्गाने वळविली आहे.
5) तिरोडाकडून गोंदिया ते गोरेगाव कडे जाणारी जड-अवजड वाहतुक तिरोडा-रामाणी लॉन-ढाकणी रोड-चुटीया-डव्वा टी पाईंट-गोरेगाव या पर्यायी मार्गाने वळविली आहे.


