
अट्टल घरफोड्या हनीफ भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…
घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हनीफ पठाण यास भद्रकाली पोलिसांनी केले जेरबंद…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक शहरात घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालणेबाबत व मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सुचना व आदेश दिले होते.


त्या अनुषंगाने किरणकुमार चव्हाण, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-१, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलिस आयुक्त, सरकारवाडा विभाग, गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संतोष नरूटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली सफौ यशवंत गांगुर्डे व पथकातील इतर अंमलदार असे भद्रकाली पोलिस ठाणेकडील घरफोडी चोरीबाबत (दि.१३फेब्रुवारी) रोजी दाखल असलेला गुन्हा रजि.नं. ४८/२०२४ भादंवि कलम ४५४,३८० प्रमाणे या गुन्हयाच्या तपासाचे अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे नापोशि अविनाश जुद्रे, पोशि. नितीन भामरे व दयानंद सोनवणे यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी येण्या-जाण्याचे मार्गावर तांत्रिक पध्दतीने तपास करून पाहीजे असलेल्या आरोपीबाबत माहीती प्राप्त केली.

पाहीजे आरोपीच्या प्राप्त केलेल्या माहीतीनुसार पोहवा सतिष साळुंके व नापोशि कय्युम सैय्यद यांनी आरोपी नामे इम्रान हानीफ पठाण, (वय २८ वर्षे), रा.नॅशनल स्वीटच्या मागे, साईनाथ नगर, भारतनगर, वडाळा, नाशिक यास वडाळा गाव येथुन ताब्यात घेऊन व त्यास पोलिस ठाणे येथे आणुन त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर गुन्हयाव्यतिरीक्त त्याने भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत मागील एक महिन्यापुर्वी रविंद्र विद्या प्रसारक मंडळ, द्वारका, नाशिक या कॉलेजमधील कार्यालयाच्या बंद दाराचे कुलूप तोडुन घरफोडीचा गुन्हा केला असल्याचे देखील निष्पन्न झाले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोउनि. यशवंत गांगुर्डे हे करीत आहेत. या मध्ये चोरीस गेलेले २१८५०/- रू. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, दोन हजार रु. रोख रक्कम असा एकूण २३८५०रु. मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-१, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलिस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संतोष नरूटे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि. सत्यवान पवार,सफौ. यशवंत गांगुर्डे, पोहवा. सतिष साळुंके, नापोशि. कय्युम सैय्यद, पोना. अविनाश जुंद्रे, पोशि. नितीन भामरे, निलेश विखे,दयानंद सोनवणे, नारायण गवळी यांनी पार पाडली आहे.


