
काही तासाचे आत उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा,चोरट्याकडुन ३ दुचाकी जप्त…
सिटी कोतवाली पोलिस स्टेशनहद्दीतुन चोरीस गेलेली दुचाकी व चोरट्यास शोधण्यात सिटी कोतवाली पोलिसांना यश,आरोपीकडुन ३ दुचाकी केल्या जप्त….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७ रोजी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे निलेश रुपराव चौधरी वय 43 वर्ष, रा परलाम ता भातकुली जि अमरावती यांनी पो.स्टे. ला तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी हिरो स्प्लेंडर प्लस क्र MH27-Y- 3990 कि – 15000रु अशी जवाहर गेट रोड वरील तल्हार ईलेक्ट्रीक दुकाणार समोर उभी केली ती कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेली अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे अंप नं 60/2024 कलम 379 भा द वि चा गुन्हा दाखल करुन तपास सुरु होता
गुन्ह्याचा तपास करित असताना यातील अधिकारी व अंमलदार यांना दि.१७ रोजी गुप्त बातमीदाराचे माहितीचे आधारे रेकॉड वरील आरोपी राहुल चंचल सोनोने वय २३ वर्ष रा रमाबाई आंबेडकर नगर अमरावती यांना गुन्ह्यात अटक करून आरोपी कडुन गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल हिरो होडा स्प्लेंडर प्लस क्र MH27-Y- 3990 कि 15000 व इतर दोन मोटार सायकल


1) पांढ-या रंगाची अँक्टावा मोपेट गाडी क्र MH 27- BC 890 कि 60000 रु

2) हीरो स्प्लेंडर काळ्या रंगाची कि 50000 रु. असा एकूण किं. 1250000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती शहर, गणेश शिंदे पोलिस उपायुक्त परीमंडळ – 2 जयदत्त भवर राजापेठ विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोहर कोटनाके, पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) ज्योती विल्हेकर, सहा. पोउपनि रंगराव जाधव,पोहवा मलिक अहेमद, नापोशि आशीष इंगळेकर, प्रमोद हरणे, पोशि पंकज अंभोरे, आनंद जाधव यांनी केली.


