
दारुबंदी कायद्यान्वये विक्रेत्यास ३ सश्रम कारावासाची व १० हजार रु दंडाची शिक्षा ठोठावली…
पोलिस स्टेशन तळेगाव हद्दीतील दारुविक्रेता यास दारुबंदी कायद्यान्वये ०३ वर्ष सश्रम कारावास व १००००/- रु दंड तसेच दंड न भरल्यास ०३ महिने साध्या कारावासाची शिक्षा…
तळेगाव शा पंत(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन तळेगाव (शा.पंत) हद्दीतील भारसवाडा येथे राहणारा आरोपी नामे शकील खाँ साहेब खाँ पठाण रा. भारसवाडा हा दिनांक १८/०१/२०२१ रोजी अवैद्ध रित्या दारु विक्री करीत असल्याची माहीती मिळाल्याने नापोशि दिगांबर रुईकर यांनी जावुन शहानिशा करुन प्रोरेड केला असता आरोपी हा दारु विक्री करत असताना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातून १० लिटर गावठी मोहा दारु जप्त केली होती. त्यावरुन पोलिस स्टेशनला आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ३६८/ २०२१ कलम ६५ (ई) मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासी अधिकारी पो.हवा सुधीर डांगे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन आरोपी विरुद्ध भरपुर व सबळ पुरावे गोळा करुन मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी कोर्ट आष्टी फरहाना शेख मॅडम यांचे न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावरुन मा.न्यायदंडीधिकारी प्रथम श्रेणी कोर्ट आष्टी फरहाना शेख मॅडम यांनी आरोपी विरुद्ध खटला चालवून गुन्ह्यात दोषसिद्धी देवून आज दिनांक २१/०२/२०२४ बुधवार रोजी आरोपी नामे शकील खाँ साहेब खाँ पठाण रा. भारसवाडा ता. आष्टी जि. वर्धा ह्यास ०३ वर्ष सश्रम कारावास व १००००/- रु दंड तसेच दंड न भरल्यास ०३ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोटावली आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. जयश्री काळे मॅडम यांनी कामकाज पाहीले, तसेच सदर कार्यवाही कोर्ट पैरवी पो.शी विजय भोयर यांनी ठाणेदार संदीप धोबे पोलिस स्टेशन तळेगाव (शा.पंत) यांचे मार्गदर्शनात केली.


सदररची सर्व कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,आर्वी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन,तळेगाव सहा पोलिस निरीक्षक संदीप ढोबे यांनी केली



