
नांदेड स्थागुशा पथकाने उघड केले घरफोडीचे १७ गुन्हे,१०लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…
नांदेड स्थागुशाने घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक…
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड शहरातील घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.


त्या अनुषंगाने पोउपनि दत्तात्रय काळे यांच्या पथकाने घरफोड्या झालेल्या विवीध ठिकाणची माहीती हस्तगत करून त्यांचे विश्लेषन करुन तसेच गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेऊन नांदेड शहरात मोठ्या प्रमाणे घरफोडी करणारे दोन इसम नामे

1) संजय दत्ता गुंठेवार (वय 33 वर्षे), व्यवसाय मजुरी रा.नंदीग्राम सोसायटी नांदेड,

2) व्यंकटेश उत्तमराव तिडके (वय 33 वर्षे) व्यवसाय मजुरी रा. बोडार, ता.जि. नांदेड ह.मु. जुनागंज नांदेड
यांना (दि.20 फेब्रुवारी) रोजी ताब्यात घेवुन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी पो.स्टे. भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर च नांदेड ग्रामीण या पो.स्टे. हद्दीत घरफोडीचे एकुण 17 गुन्हे केल्याची कबुल दिली व सदर गुन्हयातील चोरीचा मुद्देमाल सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ,बॅटरी,लॅपटॅाप,प्रिंटर,पाण्याची मोटार असा एकूण जवळपास 10,29,201/- रु. माल हा जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलिस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि दतात्रय काळे, पोलिस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, धम्मा जाधव, महेश बडगु, रंनधिरसिंह राजबंशी, गजानन बयनवाड, व चालक शेख कलीम, हनुमानसिंह ठाकुर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.


