करोडो रुपयाच्या खंडनीसाठी अपहरण झालेल्या दोन्ही ईसमांची सुखरुप सुटका करण्यात युनीट १ ला यश,एक अपहरणकर्ता ताब्यात…,

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अपहरण करुन ०४ कोटी १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,०२ अपहृत व्यक्तींची केली सुटका……
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२८) रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास सिबीएस येथुन विष्णु भागवत व त्याचा भाऊ रुपचंद भागवत यांना कोणीतरी अज्ञात इसमांनी चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे कडील गुरनं ६९/२०२४ भादवि कलम ३६४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयातील अपहृत व्यक्तींचा व आरोपीतांचा शोध घेणेबाबत  पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा प्रशांत बच्छाव ,सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा डॉ. श्री सिताराम कोल्हे
यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते.सदर गुन्हयाच्या तपासात गुन्हेशाखा युनिट क्र. १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळावर भेट देऊन घटनास्थळाचे आजुबाजुचे सीसीटीव्ही देवुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदर तपासा दरम्यान  फुटेज वरुन व तांत्रिक माहितीच्या आधारे श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, नापोशि  मिलींदसिंग परदेशी यांनी आरोपीतांची नावे १) राकेश सोनार, २) सुनिल चव्हाण, ३) संभाजी कवळे, ४) वेदांत येवला, ५) प्रशांत सुर्यवंशी अशी नावे निष्पन्न केली आरोपी यांनी खंडणीच्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी अपहृत व्यक्ती रुपचंद भागवत यास गरवारे पॉइंट येथे सोडुन दिले असल्याने त्याचेकडे तात्काळ गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांनी विचारपुस करुन घटनेची माहिती समजावुन घेवुन आरोपीतांनी खंडणीची मागणी करत असल्याचे दिसुन आले. आरोपी यांनी दुसरा अपहृत व्यक्ती विष्णु भागवत यास घेवुन फिरत होते. तांत्रिक माहिती वरुन आरोपी हे नगर जिल्हयात असल्याचे समजल्यावरून गुन्हेशाखा युनिट १ चे पथक त्यांच्या मागावर असतांना आरोपी यांनी अपहृत विष्णु भागवत यास लोणी येथे सोडल्याने त्यांची लोणी येथुन सुटका करण्यात आली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेत असतांना श्रेपोउनि रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, नापोशि मिलींदसिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील एक आरोपी हा त्याचे ताब्यातील काळया रंगाची स्कोडा कार क्र. MH 04 DN 9677 हिचेसह सातपुर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन वरीष्ठ पोलिस निरीक्षक  विदयासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत तोडकर, श्रेपोउनि रविंद्र बागुल, पोहवा महेश साळुंके, योगीराज गायकवाड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीम पठाण,नापोशि
विशाल देवरे, मिलींदसिग परदेशी,पोशि अप्पा पानवळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, अशांनी अशोक नगर येथे सापळा लावून आरोपी नामे वेदांत दत्तात्रय येवला, वय – २१वर्षे, रा- नागरे चौक, अशोकनगर, सातपुर, नाशिक यास ताब्यात घेवून त्याने दिलेल्या कबुलीवरुन त्याचे कडुन ३,००,०००/- रु. किंमतीची स्कोडा कार क्र. MH 04 DN 9677 कार जप्त करण्यात आली.तसेच ३०,०००/- रुपये किंमतीचा देशी बनावटीचा कट्टा व ५००/- रुपये किंमतीचा एक जिवंत राउंड असा एकुण ३,३०,५००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर आरोपी यांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत पाहिजे आरोपी यांचा शोध सुरु आहे
सदर गुन्हयाची उकल गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांनी उवघ्या २४ तासांत केल्याने पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नमुद पथकाला बक्षीस व प्रमाणपत्र देवुन सन्मानीत केले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक,प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत,पोउपनि विष्णु उगले, श्रेपोउनि  रविंद्र बागुल,सफौ सुरेश माळोदे, सुगन साबरे, पोहवा योगीराज गायकवाड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, धनंजय शिंदे, संदिप भांड, देविदास ठाकरे, महेश साळुंके, नाझीम पठाण, नापोशि विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पोशि अप्पा पानवळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, समाधान पवार,मपोशि अनुजा
येलवे यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!