कुख्यात गुंड कवड्या उर्फ रोहीत याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही,नाशिक काराग्रुहात रवानगी..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कुख्यात गुंड कवड्या याचेवर  MPDA कायद्यान्वये कोतवाली पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही….

नागपुर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
नागपुर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक(४) रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे कोतवाली व लकडगंज, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे रोहीत उर्फ मारी उर्फ कवडया वल्द नामदेव चांदेकर, वय २८ वर्षे, रा. आयचीत बस स्टॉपजवळ, नवाबपुरा, पोलिस ठाणे
कोतवाली, नागपूर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती,व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम १९८१ अंतर्गत दिनांक ०४.०३.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला.





त्यास दि.०४.०३.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.रोहीत उर्फ मारी उर्फ कवडया वल्द नामदेव चांदेकर याचेविरूध्द पोलिस ठाणे कोतवाली व लकडगंज येथे आपखुशीने प्राणघातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, चोरटे गृह अतिक्रमण करणे,
अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, अपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, शांतता भंग करण्याचे उद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, हदपार व मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरूध्दचे तसेच शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हेगारास सन २०२२ मध्ये कोतवाली पोलिसांकडून १०७, ११६(३) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सदर गुन्हेगारास पोलिस उप आयुक्त, परि. क्र. ३ नागपूर शहर गोरख भामरे यांनी ०३ महिन्याकरिता हदपार करण्यात आले होते. तरीही त्याने प्रतिबंधक कारवाईचे उल्लंघन करून
गैरकायदेशीर व धोकादायक गुन्हे करण्याची प्रवृत्ती निरंतर सुरूच ठेवली आहे. अलीकडील काळात त्याने पोलिस ठाणे लकडगंज व कोतवाली हद्दीत आपखुशीने प्राणघातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, आपखुशीने प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, चोरटे गृह अतिक्रमण करणे, अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, अपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे रोहीत उर्फ मारी उर्फ कवड्या वल्द नामदेव चांदेकर याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक, संतोष पाटील पोलिस ठाणे कोतवाली, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीस स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता.गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलिस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता, त्यांनी वर
नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.



सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,पोलिस उपायुक्त परीमंडळ ३ गोरख भामरे यांचे आदेशाने वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील पोलिस स्टेशन कोतवाली यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!