एस्कॅार्ट सर्विसच्या नावाखाली उच्चशिक्षितांना गळाला लावणारी टोळी बुलढाणा पोलिसांचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

उच्चशिक्षितांना एस्कॅार्ट सर्विस (कॉल गर्ल) पुरविण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीस बुलढाणा पोलिसांनी राजस्थान येथुन केली अटक….

बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा येथे राहणा-या एका उच्चशिक्षित तक्रारदाराने दिनांक (24) डिसेंबर २०२३ रोजी सायबर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दिली की, त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर एस्कॅार्ट सव्हीस नावाने सर्च केले
असता त्यांना वेगवेगळया वेबसाईट दिसल्या त्यांनी त्या वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन एस्कॅार्ट सव्हीस करीता विचारणा केली असता त्यांना चांगली सर्विस पुरविण्यात येईल असे सांगुन त्याचेकडून वेगवेगळे चार्जेस करीता वेगवेगळया बँक खात्यावर पैसे मागवून घेतले व 5,40,000/- रु ची  फसवणूक केल्याने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे अपराध क्रमांक 52/2023 कलम 419, 420 भा.दं.वि.सह कलम 66 (c) (d) IT ACT प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अधिक्षक, बुलढाणा, बी. बी. महामुनी  यांचे मार्गदर्शनाखाली प्रल्हाद काटकर तत्कालीन पोलिस निरीक्षक सायबर पो.स्टे. बुलढाणा यांनी केला असुन गुन्हयाचे तपासात आरोपींनी वापरलेले वेगवेगळे बँक अकाउंट, मोबाईल नंबर, सिसीटीव्ही फुटेज, व आरोपींचे मोबाईल लोकेशनवरुन दिनांक 02/03/2024 रोजी पोलिस अंमलदार शकील खान, राजदिप वानखडे, विकी खरात, केशव घुबे, संदीप राऊत, ऋषीकेश खंडेराव यांनी गुन्हयातील आरोपी
1)दिवान जैनुल आबेदीन वय 20 वर्ष रा. अहमदाबाद, गुजरात
2) फुझेल खान रशिद खान पठाण वय 22 वर्ष रा. अहमदाबाद, गुजराज
3)जीत संजयभाई रामानुज वय 25 वर्ष रा. अहमदाबाद, गुजरात
4) चिरागकुमार खोडाभाई पटेल वय 30 वर्ष रा. मोरैया, अहमदाबाद, गुजरात
5) मुस्तफा खान मोहम्मदखान पठाण वय 26 वर्ष रा. अहमदाबाद, गुजरात
यांना मंडाना, जिल्हा कोटा, राजस्थान येथून ताब्यात घेवून आरोपींचे ताब्यातुन एकूण 10 मोबाईल, 13 सिमकार्ड, 8 ATM कार्ड, 01 हुंडाई वरणा फोर व्हीलर व नगदी 72,200/- असा एकूण
7,27,200/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सुनिल कडासने पोलिस अधिक्षक, बुलढाणा, बी. बी. महामुनी अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल सोळंके सहा. पोलिस निरीक्षक सायबर पो.स्टे. बुलढाणा, पोलिस अंमलदार शकील खान, राजदिप
वानखडे, विकी खरात, केशव घुबे, संदीप राऊत व ऋषीकेश खंडेराव हे करीत आहेत.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!