
SDPO अकोला यांचे पथकाचा ॲानलाईन लॅाटरी सेंटरवर छापा….
उपविभागीय पोलिस अधिकारी शहर यांचे पथकाने पो.स्टे. खदान हद्दीत ऑनलाईन लॉटरीवर धडक कारवाई,२ आरोपीसह ६३,४७०/- रू चा मुद्देमाल केला जप्त….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अवैध धंदे विरोधात घेतलेल्या बैठकीत सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेऱ्श सर्व अधिकारी व प्रभारी यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने
दि.०६/०३/२०२४ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग सतिश कुलकर्णी यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे त्यांचे पथकाने पो.स्टे. खदान हद्दीत सिंधी कॅम्प खदान येथील आशा मुव्हीज गिफ्ट गॅलरी च्या बाजुला असलेल्या दुकानामध्ये अवैद्य रित्या विना परवाना राजश्री लोटो ऑनलाईन लॉटरीच्या जुगारावर पैशांच्या हारजित करीत असतांना छापा टाकला असता आरोपी नामे


१) विजयकुमार पंजुमल उर्फ होलाराम रोहाडा वय ५९ वर्ष, रा. कच्ची खोली, सिंधी कॅम्प अकोला

२) अश्वीन काशीनाथ सरदार, वय ३३ वर्ष रा.कैलास टेकडी खदान अकोला यांना जागीच पकडले व त्यांना सदर लॉटरी बाबत कागदपत्रांची मागणी केल्याने त्यांचे जवळ कुठलेही कागदपत्र नसल्याने नमुद दोन्ही आरोपी जवळुन व घटनास्थळावरून एकुण
६३,४७० / रू चा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करिता पो.स्टे. खदान यांचे ताब्यात देण्यात आला.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग सतिश कुलकर्णी व त्यांचे पथकातील
पो.उप.नि. माजीदखान पठान, व पोलिस अंमलदार अनिल खडेकार, रविंद्र घिवे, विनय जाधव, राजसिंह चंदेल यांनी केली आहे.


