कलम १४४ चे उल्लघन करणाऱ्या आस्थापनांवर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर आयपीएस सत्यसाई यांची धडक कारवाई, दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल….

लोणावळा(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आता दोनच दिवसांआधी म्हनजे दिनांक ०६/०३/२०२४ रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरिता मा.अपर जिल्हा दंडाधिकारी,पुणे यांनी सीआरपीसी कलम १४४ अन्वये प्रतिबंध आदेश जारी केले होते. तसेच सहाय्यक पोलिस अधिक्षक  सत्यासाई कार्तिक यांनी सर्व आस्थापना चालकांना सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती कार्तिक यांना प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा करण्याकामी सत्यासाई कार्तिक यांनी आज दिनांक ०८/०३/२०२४ रोजी त्यांचे पथकाला  माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवले असता





१)दीपा बार अँड रेस्टॉरंट, कामशेत , तालुका मावळ जिल्हा पुणे, व २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट, वडगाव, तालुका मावळ जिल्हा पुणे



अशा दोन्ही ठिकाणी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील दोन्ही बार रेस्टॉरंट त्यांचे ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई. विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी विक्री करताना दिसून आले, तसेच सदर बारमध्ये ऑर्केस्ट्रा- संगीत विहित कालमर्यादेपेक्षा पेक्षा अधिक वेळेसाठी सुरू असल्याचे मिळून आल्याने नमूद दोन्ही बारमालकांवर भा.द.वि. कलम १८८ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (डब्ल्यू) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे अनुक्रमे कामशेत पोलिस  स्टेशन व वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आले असून पुढील तपास कामशेत व वडगाव मावळ पोलीस करत आहेत.



तसेच अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढेदेखील सुरुच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन  सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक  रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ,पोउनि  शुभम चव्हाण, भारत भोसले, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, नापोशि दत्ता शिंदे,पोशि सुभाष शिंदे, राहीस मुलानी यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!