
पानटपरीवर गांजाची अवैधपणे विक्री करणारा स्थागुशा पथकाच्या ताब्यात…
अवैधरित्या गांजाची विक्री करणा-यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात, ६४०००/- रु चा गांजा केला जप्त…
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक, हिंगोली जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विकी विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.पोनि विकास पाटील यांना दिले होते.


त्या अनुषंगाने दिनांक १३/०३/२०२४ रोजी सपोनि शिवसांब घेवारे यांचे पथक हिंगोली शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, बसस्थानक परीसरात राज पान शॉप हिंगोली येथे अवैधरित्या गांजा विक्री चालु आहे. अशी माहिती मिळाल्यावरून स्थागुशा च्या पोलिस पथकाने पंचासह दुपारी ०३.२५ वा दरम्यान बसस्थानक परीसरातील राज पान शॉप येथे छापा मारला असता तेथे पानपटटी चालक शेख अहेमद उर्फ अमर शेख दाउद वय ४१ वर्ष रा. मस्तानशहानगर हिंगोली हा मिळुन आला. पोलीस पथकाने त्यांच्या पानपटटीची झडती घेतली असता २.५६० कि.ग्रॅ.किमती ६४,००० रू चा वाळलेला गांजा मिळुन आला. तसेच सदराचा गांजा हा इसम नामे ईसाक रा नांदेड येथील यांच्या कडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून पोस्टे हिंगोली शहर येथे आरोपी नामे १) शेख अहेमद उर्फ अमर शेख दाउद वय ४१ वर्ष रा. मस्तानशहानगर हिंगोली २) ईसाक रा. नांदेड या दोघांविरूदध पोस्टे हिंगोली शहर कलम ८ (क), २० (ब) ii (क) एन.डी.पी.एस. अॅक्ट व सहकलम ३४ भादंवी. प्रमाणे सपोनि घेवारे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, मा. अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि. शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार, पांडुरंग राठोड, पारू कुडमेथा, नितिन गोरे, अशोक धामणे, संभाजी लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे, धनंजय क्षिरसागर यांनी केली आहे.



