
गांजाची अवैधरित्या विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील पाटणबोरी येथुन 5.271 किलोग्रॅम गांजा कि 63,576/- रु चा केला जप्त…..
पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटनासह जिल्हयात होणारी अंमली पदार्थाची वाहतुक /साठवणुक व विक्री करीता बाळगुण असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवुन जिल्हयात गांजा सारख्या अंमली पदार्थाची विक्री होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरुनच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सातत्याने करीत होती
अशातच स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक दिनांक 13/03/25024 रोजी पोलिस स्टेशन पांढरकवडा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपणीय माहिती मिळाली की, ग्राम पाटणबोरी येथील शिवाजी चौक येथे राहणारा इसम नामे गंगाधर पत्रीवार हा त्याचे राहते घरात अवैधरित्या गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करीता बाळगुन आहे. अशा माहिती वरुन पथकाने माहितीचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांना सदर माहितीची कल्पना देवुन वरिष्ठांचे मागदर्शनात राजपत्रीत अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंच, मापारी, फोटोग्राफर व स्थानिक पोलिस अधिकारी अंमलदार यांना सोबत घेवुन सर्व तयारीनिशी माहिती प्रमाणे ग्राम पाटणबोरी येथे छापा कारवाई केली असता इसम नामे गंगाधर नारायण पत्रीवार वय 43 वर्षे रा. पाटणबोरी याचे राहते घरात घरातील एका खोलीत पांढरे रंगाचे प्लास्टीक कट्टयात हिरवट काळपट ओलसर गांजा ज्यात फुले बिया पाने वनस्पतीची शेंडे
असलेला असा एकुण 5.271 ग्राम किमंत 63,576/- रु चा मिळुन आल्याने रितसर पंचनामा कारवाई करुन जप्त करण्यात आला
असुन आरोपी नामे गंगाधर नारायण पत्रीवार वय 43 वर्षे रा. पाटणबोरी ता. पांढरकवडा जि. यवतमाळ याचे विरुध्द पो.स्टे.
पांढरकवडा येथे एन.डी.पी.एस अंतर्गत गुन्हा नोंद करुन पुढील कारवाई करीता पो.स्टे.चे ताब्यात दिले आहे.


सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक,डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुश जगताप, रामेश्वर वैंजने, उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक स्थागुशा, दिनेश झांबरे पो.नि. पो.स्टे. पांढरकवडा व स्था.गु.शा. कडील पोउपनि रामेश्वर कांडुरे, अंमलदार सुनिल खंडागळे, सुधिर पांडे,निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी, नरेश राऊत व पो.स्टे. पांढरकवडा येथील अंमलदार किशोर आडे, छंदक मनवर, तुकाराम जंगवाड यांनी केली



