चंद्रपुर पोलिसांनी ४८ तासाचे आता घरफोडीचा केला उलगडा,रामनगर,स्थागुशा ची कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह रामनगर पोलिसांच्या ताब्यात…





चंद्रपूर (प्रतिनिधी) – रामनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्याच्याकडुन घरफोडीतील एकूण सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी खुशाल अडवानी (वय ३८ वर्षे), रा.सिंदी कॉलनी, रामनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. ३००/२०२४ कलम ४५४, ४५७ आणि ३८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.



या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१८मार्च) रोजी फिर्यादी नामे खुशाल भागचंद अडवानी (वय ३८ वर्षे), व्यवसाय व्यापार रा.सिंदी कॉलनी रामनगर चंदपुर यांनी पोलीस स्टेशन, रामनगर येथे तक्रार दिली की, (दि.१५ मार्च) रोजी दुपारी ०१:३० वा.दरम्यान यातील फिर्यादी हा त्याचे परिवारासह विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे नातेवाईकांचे घरी कार्यक्रमाकरीता घराचे समोरील दरवाज्याला लॉक करून गेले होते. नातेवाईकाच्या घरचा कार्यक्रम पुर्ण करून (दि.१८मार्च) रोजी सकाळी ०८:०० वाजता घरी परत आले. यातील फिर्यादी हा त्यांचे बॅग हे वडीलाचे बेडरूमध्ये ठेवण्याकरीता गेला असता, वडीलाचे बेडरूममधील खिडकीचे ग्रिल तुटलेले दिसले. तेव्हा बेड रूमधील आलमारीची पाहणी केली असता, आलमारी मधील रोख रक्कम २६,००,०००/- रूपये (सव्वीस लाख रूपये) चोरी झाल्याचे दिसुन आले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क्र.३००/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला होता.



नमुद गुन्हयाची घरफोडी ही मोठ्या रक्कमेची व अतिशय गंभीर स्वरूपी असल्याने पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाचे आजु-बाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक करून गोपनीय बातमिदाराचे माहीती वरून अतिशय परिश्रम घेऊन तांत्रिक पध्दतीने कौशल्यपुर्ण तपास करून फिर्यादीचे घरी चौकीदार म्हणुन काम करणारा नामे विकास महादेव गोंधळी, (वय३२ वर्षे), रा.तोहगांव, ता.गोंडपिपरी, चंद्रपुर, ह.मु. भागचंद अडवाणी यांचे घरी सिंधी कॉलनी चंद्रपुर यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. या मध्ये आरोपीकडून १) रोख रक्कम २६,००,०००/- रू.,२) इलेक्ट्रीक कटर मशिन कि.अं.२,०००/- रु. ३) एक सी.पी. प्लस कंपनीचा डिव्ही.आर.कि.अं.४,०००/- रु. ४) एक लोखंडी छनी कि.अं.१००/-रू., ५) एक लाल रंगाची पकड असलेले कटर कि. १००/- रु. ६) इलेक्ट्रीक ॲक्टेन बोर्ड. अं.५००/- रु.असा एकुण नगदी २६,०६,७००/- रू. मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे

सदर कार्यवाही ही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलिस अधिकारी, सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल गाडे, पोलिस स्टेशन, रामनगर, पोनि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, स्थागुशा, चंद्रपुर तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर सपोनि देवाजी नरोटे, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा. पेतरस सिडाम, पोहवा. किशोर वैरागडे, पोहवा. रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा. शरद कुडे, पोहवा.सतिश अवयरे, पोहवा.आनंद खरात, पोहवा. प्रशांत शेंदरे, नापोशि.लालु यादव, पोशि.हिरालाल गुप्ता, पोशि. रविकुमार ठेगळे, पोशि.प्रफुल गारघाटे, पोशि. संदिप कामडी, पोशि.विकास जुमनाके, पोशि.विकास जाधव, पोशि.पंकज ठोंबरे, मपोहवा. मनिषा मोरे आणि पोलिस स्टेशन, रामनगर यांनी संयुक्तपणे केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!