
विशेष पोलिस महानिरीक्षक यांची उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय तसेच विविध पोलिस स्टेशन ला भेटी….
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची पुणे ग्रामीण पोलिस दलातील उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय व विविध पोलिस स्टेशनला भेटी….
पुणे (प्रतिनिधी) – विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर सुनील फुलारी हे दौऱ्यावर असताना त्यांनी ग्रामीण पोलिस दलास वार्षिक कामकाज निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. या वेळी त्यांनी अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याबरोबरच ग्रामीण पोलिस दल सक्षम करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिस दलाला सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे ते म्हणाले.


सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांच्या पुणे ग्रामीण दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलिस स्टेशनचे वार्षिक निरीक्षणाचा नियोजीत कार्यक्रम पार पडला तेव्हा वार्षिक निरीक्षण अनुषंगाने सुनिल फुलारी, यांनी जुन्नर, लोणावळा, शिरुर ह्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, तसेच आळेफाटा, लोणावळा, शिरुर पोलिस स्टेशनला भेट दिली. या वेळी पंकज देशमुख, पोलिस अधिक्षक , पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलिस अधिक्षक, पुणे विभाग, संजय जाधव, अपर पोलिस अधिक्षक, बारामती विभाग हे उपस्थित होते. निरीक्षणा दरम्यान विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांना मानवंदना देण्यात आली.

उपविभागातील सर्वप्रभारी अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आगामी काळात येणारे सन, उत्सव, रमझान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व सार्वत्रिक लोकसभा निवडणुक सन २०२४ च्या अनुषंगाने तयारी आढावा घेण्यात आला. उपविभातील गुन्हा उकल, दोषसिध्दी, मुद्देमाल निर्गती, एन.डी.पी.एस गुन्हे या सरख्या महत्वाचे मुद्दे यांचेवर विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांनी उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन केले.

पोलिस स्टेशन निरीक्षणा वेळी दुय्यम पोलिस अधिकारी यांच्या मुलाखती व पोलिस अंमलदार यांच्याशी संवाद साधला. पोलिस स्टेशन मधील दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. दैनंदिन कामाकाजात येणारे अडचणीची माहिती घेतली व कामकाजात तत्परता, शिस्त, डायल ११२, जनतेशी संवाद साधुन गोपनीय माहीती हस्तगत करणे या विषयी मार्गदर्शन केले. पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या, तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता कमिटीतील सदस्यांची भेट घेतली व येणारे सण, उत्सव, रमझान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व सार्वत्रिक लोकसभा निवडणुक सन २०२४ च्या दृष्टीने आपआपले गावहद्दीत पोलीस दलाच्या सहकार्यातुन जातिय सलोखा अबाधित राहुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या बाबत मार्गदर्शन केले.


