
वार्षिक निरीक्षणा दरम्यान IGP यांनी घेतल्या विविध संघटना व पदाधिकारी यांच्या बैठका….
वार्षिक निरीक्षणाच्या अनुषंगाने पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची पुणे ग्रामीण येथील विविध कमिटी,पोलिस पाटील,उद्योजक यांचेसोबत गाठी भेटी व बैठका…..
पुणे (प्रतिनिधी) – सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र हे दौऱ्यावर असताना त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलास वार्षिक कामकाज निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. या वेळी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलिस पाटील, उद्योजक संघटना सदस्य, शांतता कमीटी सदस्य व सरकारी अभियोक्ते यांचेशी संवाद साधणे करीता बैठक आयोजित करण्यात आली होती. या मध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना त्यांना येणाऱ्या अडचणी जाणुन घेतल्या व आगामी काळात येणारे सन, उत्सव, रमझान ईद, रामनवमी, डॉ.बाबासाहेब अंबेडकर जयंती व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.


सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक साो, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर, यांचे वार्षिक निरीक्षण अनुषंगाने (दि.०२मार्च) रोजी सायंकाळी १६.०० वा. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस पाटील, उद्योजक संघटना सदस्य, शांतता कमीटी सदस्य व सरकारी अभियोक्ते यांचेशी संवाद साधणे करीता बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस पाटील, उद्योजक संघटना सदस्य, शांतता समितीतील सदस्य व विधी व न्याय विभागातील श्रीमती क्रांती कुलकर्णी प्रमुख जिल्हा सरकारी अभियोक्ता (क्राईम विभाग), प्रमोद बोंभटकर प्रमुख जिल्हा सरकारी अभियोक्ता (सिव्हील विभाग) व इतर २९ सरकारी अभीयोक्ते उपस्थित होते.

सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक साो, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर, यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना त्यांना येणाऱ्या अडचणी जाणुन घेतल्या व आगामी काळात येणारे सन, उत्सव, रमझान ईद, रामनवमी, डॉ.बाबासाहेब अंबेडकर जयंती व लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने मार्गदर्शन केले. पुणे ग्रामीण पोलीस दल यांच्याशी समन्वय साधुन आपआपले गाव हद्दीत महत्वाचे ठिकाणी सी.सी.टीव्ही बसविणे, ग्राम रक्षक दल कार्यान्वित तयार करण्याचे आवाहन केले. पोलीस पाटील यांनी आपआपले गाव हद्दीत होणारे गैरप्रकार, अवैध धंदे, अनोळखी इसम, लुट, घरफोडी चोरी करणाऱ्या टोळ्यांबाबत हद्दीतील पोलीस स्टेशन व आवश्यकता भासल्यास जिल्हा विशेष शाखा यांच्याश्री समन्वय साधावा अशा सुचना दिल्या, पुणे ग्रामीण जिल्हा हद्दीतील उद्योजक संघटना सदस्य यांच्याशीही संवाद साधला व त्यांना येणाऱ्या अडीअडचणीचा आढावा घेतला व पोलीस प्रशासनाकडुन सहकार्याचे आश्वासन दिले.

आगामी काळातयेणारे सण, उत्सव, रमझान ईद, रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व लोकसभा निवडणुक बाबत शांतता समितीतील सदस्यांशी चर्चा केली. तसेच शांतता समिती, पोलीस प्रशासनाचे सहकार्याने जिल्ह्यात जातीय सलोखा राखुन व कोणताही अनुचीत प्रकार न होऊ न देता शांततेत पार पाडतील असा विश्वास सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर, यांनी व्यक्त केला आहे. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दोषसिध्दता वाढविणे संदर्भाने अधिकारी व सत्र न्यायालयातील सरकारी अभियोक्ते यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सदर बैठकीत कोर्टात चालणाऱ्या केस करीता दत्तक अधिकारी / केस अधिकारी नेमावे, पुराव्याची साखळी कोर्टा समोर आणावी, मुद्देमालाचे केसच्या अनुषंगाने मुद्देमाल कारकुन व पैरवी अधिकारी यांनी मुद्देमाल तात्काळ संबंधित कोर्टात जमा करावा, एन.डी.पी.एस च्या गुन्ह्यात इनव्हेंटरी प्रक्रिया करावी तसेच सरकारी वकीलांचे सहकार्य घेऊन मुद्देमालाची निर्गती करावी. साक्षिदार / आरोपी कोर्टात हजर राहत नसतील तर सरकारी वकीलांचे सहकार्याने वॉरंट, जाहीरनामा, संपत्ती जप्त करणे इ.बाबत कारवाई करावी, असे सांगितले. सदर बैठकीत पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल झालेल्या महत्वाच्या गंभीर केसेस तात्काळ बोर्डावर घेवून लवकरात लवकर निकाल लावणे बाबत प्रयत्न करावे अशी सुचना सुद्धा दिली.


