दरोड्याच्या तयारीतील तिघांना गुन्हे शाखेने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दरोड्याच्या तयारीतील तिघांना गुन्हे शाखेने केली अटक…

धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. म्हणुन त्या अनुषंगाने पोलिसांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना दिसले की, साळुंके नगर पाटीजवळ अंधारामध्ये रोडच्या बाजुस एक राखाडी रंगाची मारुती इको व्हॅन थांबलेली आहे. त्या मध्ये जाऊन पाहिले असता, त्या मध्ये पाच इसम तोंडाला मास्क बांधून बसलेले दिसले. पथकाने त्यांना खाली उतरण्यास सांगितले तेव्हा त्यातील दोघे पळून गेले, आणि तिघे सापडले. पथकाने त्या तिघांसह 5 लाख रु. किमतीची एक राखाडी रंगाची मारुती इको हि सुद्धा जप्त केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. हुसेन नसीरखान सय्यद (वय 38 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात भा.दं.सं.कलम 34,399 आणि 402 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.





स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, पोहेकॉ.विनोद जानरव, पोहेकॉ. निंबाळकर, पोहेकॉ. वाघमारे, पोहेकॉ. सय्यद, पोना. जाधवर, पोना. जाधवर, पोकॉ. अरसेवाड, चालकपोकॉ. किवडे यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढात पेट्रोलिंग करत असताना (दि.16एप्रिल) रोजी 22.10 वा.सु. साळुंके नगर पाटीजवळ धाराशिव येथे आले असता पाटीजवळ अंधारामध्ये रोडच्या बाजूस एक राखाडी रंगाची मारुती इको व्हॅन संशईतरीत्या आंधाराचा दबा धरुन बसलेले दिसून आल्याने पथकाने गाडीजवळ जाऊन पाहीले असता गाडीतील इसम हे तोंडाला मास्क व रुमाल बांधलेले असल्याचे दिसून आले पथकास त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव- 1) शंकर भैरु चव्हाण, (वय 30 वर्षे), 2) सुरेश भैरु चव्हाण, (वय 42 वर्षे), दोघे रा.मोघा बी.ता.आळंद, जि.गुलबर्गा, राज्य कर्नाटक, 3) कालीदास राम काळे, (वय 57 वर्षे), रा.मालवानी मलाड अंबोजोवाडी आझादनगर मुंबई हा.मु. केमवाडी ता.तुळजापूर, जि.धाराशिव असे सांगितले. या वेळी सुनिल श्रावण शिंदे, रा. सुंभा, ता.जि. धाराशिव आणि अक्षय बाळू शिंदे, रा. कोंड, ता.जि.धाराशिव हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.



या कारवाईत एक राखाडी रंगाची मारुती इको या कंपनीची कार क्र. एमएच 47 एएन 9619, एक लोखंडी कुऱ्हाड, लाकडी दांडे, एक लोखंडी पक्कड, स्क्रु ड्रायव्हर, एक हेक्सॉ ब्लेड, तोंडाला बांधण्या करीता वापरलेले मास्क, व हातरुमाल असा एकुण 5,00,000/-₹ असा मुद्देमाल जप्त केला आहे. अन् त्या तीन आरोपींना मालासह धाराशिव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.



अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ. विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, पोलिस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलिस अंमलदार रविंद्र आरसेवाड, चालकपोकॉ. किवडे यांच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!