
अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात….
अवैधरित्या रेतीची(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही,वाहनासह एकुण ८१४०००० /- रू चा मुद्देमाल जप्त….
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२५) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, सोंडा जि. भंडारा येथुन अवैधरित्या रेती भरुन दोन टिप्पर रामटेक कडे येत आहेत. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून स्टाफ यांनी नाकाबंदी करून खिंडशी तलावाजवळ
रोडवर तुमसर मार्गे कडुन रामटेककडे जाणाऱ्या रोडने दोन टिप्पर एका मागे एक येतांना दिसल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता दोन्ही टिप्पर चालकांनी त्याचा ताब्यातील टिप्पर तिथे न थांबवता समोर निघुन गेला


त्यामुळे पथकाने दोन्ही टिप्परचा पाठलाग करून १) ट्रक क्र. MH 49 BZ0152 चा चालक आरोपी हर्षल गणेश वाडवे वय २९ वर्ष रा. KGN सोसायटी काटोल नाका मकड धोकडा नागपुर याने आपल्या ताब्यातील वाहनामध्ये १२ ब्रास रेती प्रति ब्रास ५००० /- रू. प्रमाणे किंमती ६०,००० /- रू. २) ट्रक क्र. MH 49 BZ 2152 चा चालक अजमंद कलंदर बेग वय ३९ वर्ष रा. सुरेंद्र नगर गिट्टी खदान नागपुर याने आपल्या वाहनात १२ ब्रास रेती प्रति ब्रास ५०००/-रू. प्रमाणे किंमती ६०,०००/- रू. दोन्ही वाहनातील एकुण २४ ब्रास रेती अवैधरीत्या विनापरवाना वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपींच्या ताब्यातून १) ट्रक क्र. MH 49 BZ0152 किंमती ४०,००,०००/- रू. मध्ये १२ ब्रास रेती किमती ६०,००० /- रू. २) २) ट्रक क्र. MH 49 BZ 2152 किंमती ४०,००,०००/- रू. मध्ये १२ ब्रास रेती किंमती ६०,००० /- रू. ३) विविध कंपन्यांचे मोबाईल २०,००० /- रू. असा एकुण ८१,४०,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी १) हर्षल गणेश वाडवे वय २९ वर्ष रा. KGN सोसायटी काटोल नाका मकड धोकडा नागपुर २) अजमंद कलंदर बेग, वय ३९ वर्ष, रा. सुरेंद्र नगर गिट्टी खदान नागपुर (३) मालक सलमान अब्दुल रहमान वय ४८ वर्ष रा. टेका नाका नागपुर ४) शुभम याचे विरुध्द पोस्टे रामटेक येथे कलम ३७९, १०९, ३४ भादंवि सहकलम ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६, सहकलम ४,२१ खानी खनिजे (विकास आणि नियमन) अधि. १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेरकी, नापोशि प्रणय बनाफर, पोशि बालाजी बारगुले, पोशि कार्तिक पुरी विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी केली.



