
विक्रीकरीता अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारा युनीट २ च्या ताब्यात
अंमली पदार्थ एम.डी पावडर विक्री करीता बाळगणार्यास गुन्हेशाखा युनिट २ ने ताब्यात घेऊन जप्त केले १० लक्ष रु चे ड्रग…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,पोलिस आयुक्त नागपुर शहर यांनी तरुण वर्गामधे अंमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण याला निर्बंध घालण्यासाठी विशेष मोहीमे राबविण्यासाठी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते


त्याअनुषंगाने दि (११) चे १० वा. चे सुमारास, गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलिस ठाणे अजनी हद्दीत, चिमनी चौक, ठवरे हायस्कुल जवळ, एका मारोती डिझायर वाहना मधील ईसम एम डी पावडर विक्री करीता आणनार आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून त्याठिकाणी सापळा रचुन छापा कारवाई केली असता. आरोपी १) सोनू उर्फ भिमा राजेश उगरेजा वय २१ वर्ष, रा. १०४, चंद्रनगर, अजनी, नागपूर हा समक्ष मिळुन आला. त्याची अंगझडती घेतली असता. त्यांचे ताब्यातुन १०६.९१ ग्रॅम एम.डी पावडर किंमती १०,६९,१०० /- रू. ची मिळुन आली.

तसेच आरोपीचे ताब्यातुन एम.डी पावडर, मारोती डिझायर कार, वजन करण्याचे साहित्य, दोन मोबाईल फोन, रोख २,०८० /- रू असा एकुण १६,४४,१८०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचा साथिदार आरोपी २) पंकज साठवणे रा. नागपूर यांचे मदतीने एम.डी पावडर प्राप्त केल्याचे सांगीतले.यावरुन त्यांचेविरुध्द कलम ८ (क), २२ (क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलिस ठाणे अजनी येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.अटक आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाई कामी अजनी पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नागपूर शहर डॅा रविंद्र सिंघल, सह. पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील, पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) निमीत गोयल ,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ च्या वरीष्ठ मपोनि. शुभांगी देशमुख, सपोनि. गजानन चांभारे, पोहवा. राजेश तिवारी, महेन्द्र सडमाके, शैलेष जांभुळकर, दिपक चोले, नापोशि अर्जुन यादव, दिनेश डवरे, संदीप चंगोले, सुनिल कुवर, पोअं. संदीप पांडे व प्रविण चव्हाण यांनी केली.


